आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या मुलीच्या लग्नात जबरदस्त नाचला सलमान खान, \'जुम्मे की रात..\' गाण्यावर दाखवल्या डान्स मुव्ह्ज, व्हायरल होत आहे Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : साउथ फिल्मचे प्रसिद्ध स्टार व्यंकटेश दग्गुबतीची मुलगी आश्रिता हिचे लग्न झाले. मित्राच्या मुलीच्या लग्नात सामील झालेला सलमान खान याप्रसंगी खूप नाचला. त्याने व्यंकटेश आणि राणा दग्गुबतीसोबत 'जुम्मे की रात..' गाण्यावर डान्स केला. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयपुरमध्ये झालेल्या लग्नाच्या फंक्शन्समध्ये साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलेब्स सामील झाले होते. 

लग्नात चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा आणि सून उपासना हेदेखील पोहोचले होते. त्याबरोबरच नागार्जुनच मुलगा नागा चैतन्य आणि सून समांथा यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. फिल्म 'बाहुबली' मध्ये भल्लालदेवची भूमिका करणारा राणा दग्गुबती आणि 'ओ ओ जाने जाना' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला सिंगर कमाल खान हेसुद्धा या लग्नासाठी उपस्थित होते. व्यंकटेश यांनी साउथ चित्रपटांसोबतच काही बॉलिवूडच्या चित्रपटातही काम केले आहे. करिश्मा कपूरसोबत त्यांची फिल्म 'अनाड़ी' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. आश्रिताव्यतिरिक्त व्यंकटेश यांना हयावाहिनी आणि भावना या दोन मुली आहेत.

बातम्या आणखी आहेत...