आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने केला 'बिग बॉस 13' च्या लॉन्च डेटचा खुलासा, चौथा प्रोमो झाला रिलीज   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खानचा रियलिटी शो 'बिग बॉस 13' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून मेकर्स शोचे प्रोमो रिलीज करत आहेत. अशातच रिलीज झालेल्या एका प्रोमोमध्ये सलामनने शो लॉन्चची डेट सांगितली आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर शोचा चौथा प्रोमो रिलीज केला गेला आहे आणि यामध्ये सांगितले आहे की, हा शो 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या नव्या प्रोमोमध्ये सलमान खान शेफ बनून खिचडी बनवताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये सांगितले आहे की, शोमध्ये रायता पसरणार आहे. 

यापूर्वीच्या प्रोमोमध्ये सांगितले गेले आहे की, यावेळी शो खूप वेगळा असणार आहे. शोच्या चार आठवड्यातच फायनलिस्ट निवडले जातील आणि आणि स्पर्धकांचे युद्ध सुरु होईल. या सीजनमध्ये सर्व सेलेब्रिटीज असतील. मेकर्सने सीजन 13 मध्ये कॉमनर्सला न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशामध्ये फॅन्स खूप उत्साहित आहेत की, कोणकोणते सेलेब्रिटीज यावेळी शोमध्ये दिसणार आहेत.