आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या घराबाहेर सकाळी-सकाळी लागते लांबच लांब रांग, अभिनेत्याला पाहण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी नव्हे तर एका खास कारणाने तिथे येतात लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 53 वर्षाच्या सलमान खानच्या घराबाहेर रोज सकाळी लांबच लांब रांग लागलेली दिसते. पण हि गर्दी सलमानला पाहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी नाही तर लोक तिथे उपचार करून घेण्यासाठी येतात. सलमान त्याची संस्था बीइंग ह्यूमनच्या माध्यमातून चैरिटी करतो. सलमानच्या वडीलांनी मुंबईच्या आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गरिबांसाठी फ्री उपचाराची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रोज सकाळी लोकांची तेथे गर्दी जमा होते. 

 

साडे 8 वाजता उघडतो गॅलेक्सीचा दरवाजा... 
गॅलेक्सीच्या समोर लोक रांगेत उभे राहतात. सकाळी 8.30 वाजता सलीम खान गॅलेक्सीचा दरवाजा उघडून बाहेत येतात. त्यांच्यासोबत एक डॉक्टरसुद्धा असतो. डॉक्टर तेथील रुग्णांना तपासून त्यांना प्रिस्क्रिप्शन देतात आणि हॉस्पिटलमध्ये रेफर करतात. हे डॉक्टर केवळ रेफरच करत नाही तर त्यांच्या उपचारात किती खर्च येईल हेही सांगतात, मग सलीम खान त्यांना चेक देतात. हा चेक रुग्णाच्या नावाने नाही तर हॉस्पिटलच्या नावाने असतो. 

 

2007 पासून चालू आहे हे काम.. 
सलीम खान मागील 11 वर्षांपासून यापद्धतीने गरिबांची सेवा करतात. सोमवार ते गुरुवार रोज सकाळी 8 त्यांचा हा दवाखाना उघडतो. सलीम खानने या गोष्टीचा कधीही वाजागाजा केला नाही. यासंबंधी त्यांनी एकदा सांगितले होते की, चांगल्या कामांसाठी वाजागाजा करण्याची गरज नसते. 

बातम्या आणखी आहेत...