आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानसाठी लकी आहे ईद, 9 पैकी 8 चित्रपट आहेत ब्लॉकबस्टर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सलमान खानने ईदच्या दिवशी आपला चित्रपट रिलीज केला आहे. ईदच्या दिवशी त्याचा 'भारत' रिलीज झाला आहे. तसे पाहीले तर, मागील अनेक वर्षांपासून सलमान आपल्या फॅन्ससाठी ईदच्या दिवशी आपला चित्रपट रिलीज करतो. आतापर्यंत 9 वेळेस ईदच्या दिवसी सलमानचे चित्रपट रिलीज झाले आहेत. 'भारत' हा त्याचा 10 वा चित्रपट ईदच्या दिवसी रिलीज होतोय. खास बाब म्हणजे या 9 चित्रपटांपैकी 8 चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे, तर एक चित्रपट फ्लॉप ठरला.  2009 मध्ये ईदच्या दिवशी सलमानचा 'वॉन्टेड' हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर 2013 सोडून दर वर्षी त्याचा चित्रपट हिट ठरला आहे.


9 वर्षात ईदच्या दिवशी आलेल्या सलमानचे चित्रपटे
 

रेस 3 (2018)
रेस आणि रेस-2 च्या रोमांच आणि ट्विस्टनंतर रेस 3 2018 मध्ये रिलीज झाली होती. रेमो डिसूजाच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपाटात सलमान खान, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडीज, बॉबी देओल, डेजी शाह हे होते.


ट्यूबलाइट (2017)
या चित्रपटाची गोष्ट दोन भाऊ भरत सिंह बिष्ट (सोहेल खान) आणि लक्ष्मण सिंह बिष्ट (सलमान खान) ची आहे. मोठे झाल्यावर भरतला आर्मीकडून युद्ध लढण्यासाठी बाहेर जावे लागते. अनेक दिवस उलटूनही भरत परत येत नाही, तर मग लक्ष्मण त्याला शोधण्यासाठी जातो. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान ने केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला होता.


सुल्तान (2016)
अली अब्बास जफरच्या दिग्दर्शानात बनलेली सुल्नातची गोष्ट एका रेसलरची होती, जो आपल्या प्रेयसीच्या नजरेत इज्जत मिळवण्यासाठी प्रोफेशनल रेसलिंगमध्ये येतो. चित्रपटात सलमानच्या पत्नीचा रोल अनुष्का शर्माने केला होता.


बजरंगी भाईजान (2015)
चित्रपटाताची गोष्ट सलमान खान आणि चाइल्ड आर्टिस्ट हर्षाली मल्होत्राची आहे. हर्षाली चित्रपटात पाकिस्तानमधून चुकून भारतात आलेल्या लहान मुलीची आहे. इथे तिची भेट पवन कुमार चतुर्वेदी(सलमान खान) सोबत होती, आणि तो तिला पाकिस्नात जाण्यासाठी मदत करतो. 


किक (2014)
चित्रपटाची गोष्ट देवी लाल सिंह (सलमान खान) ची आहे. देवी सिविल इंजीनियरिंगमध्ये ग्रॅजुएट आहे आणि त्याने 30 पेक्षा जास्त नोकऱ्या आपल्याला किक मिळत नाही म्हणून सोडल्या आहेत. त्यानंतर तो लोकांची मदत करतो आणि त्याला किक मिळते. हा चित्रपट 2009 मध्ये आलेल्या तेलुगू चित्रपट 'किक'चा रिमेक आहे.


एक था टाइगर (2012)
या चित्रपटात सलमान खानने एका रॉ एजंटची भूमिका केली आहे, ज्याचे कोड नेम टायगर आहे. मागील 12 वर्षांपासून त्याने सुट्टी घेतलेली नाहीये आणि तो एका नंतर एक इंटरनॅशनल आसाइनमेंट करतच असतो. चित्रपटात कॅटरिनादेखील आहे.

 

बॉडीगार्ड (2011)
या चित्रपटात सलमान एका बॉडीगार्डच्या भूमिकेत आहे. तो आपल्या मालकाच्या मुलीच्याच प्रेमात पडतो आणि पुढे संघर्ष करतो. या चित्रपाटेच दिग्दर्शन सिद्दीकी यांनी केले आहे.

 

दबंग (2010)
या चित्रपटात सलमान दंबग पोलिस अधिकारी चुलबूल पांडेच्या भूमिकेत आहे. या चित्रपाटतून सोनाक्षी सिन्हाने डेब्यू केले होते.

 

वाँटेड(2009)
चित्रपटात सलमान राधे नावाच्या गँगस्टरच्या भूमिकेत आहे, जो पैशांसाठी कोणाचाही खून करण्यास तयार असतो. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा सलमानचे हीट चित्रपट...

बातम्या आणखी आहेत...