आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टटेन्मेंट डेस्क: सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट 'भारत'ची माल्टामध्ये शूटिंग करतोय. डायरेक्टर अली अब्बास जफर यांच्या या चित्रपटाच्या सेटवरुन काही फोटोज लीक झाले आहेत. हे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका फोटोमध्ये सलमान चित्रपटाच्या सेटवर टेंशनमध्ये दिसतोय. त्याच्या अवतीभोवती फिल्मचे क्रू मेंबर्स आहेत. एका दूस-या फोटोमध्ये सलमान माल्टाच्या रस्त्यावर एकटाच फिरताना दिसतोय. यावेळी त्याने ब्लॅक टी-शर्ट आणि पँट घातलेली आहे. काही दिवसांपुर्वी सलमान आईचा हात पकडून माल्टाच्या रस्त्यांवर दिसला होता.
'भारत' चित्रपटामध्ये कतरिना
- सलमान खानचा भारत हा चित्रपट 2019 मध्ये ईदला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान कतरिनासोबत रोमान्स करेल.
- पहिले हा चित्रपट प्रियांका चोप्राला ऑफर झाला होता. परंतू प्रियांकाने ऐनवेळी लग्नाचे कारण देत चित्रपट सोडला.
- प्रियांकाने चित्रपट सोडल्यामुळे सलमान तिच्यावर नाराज होता असे वृत्त होते. नंतर सलमानचे वडील सलीम खान म्हणाले की, कुणीही चित्रपट सोडल्याने काही फरक पडत नाही. प्रियांकाच्या जागी दुसरी कुणीतरी येईल.
- प्रियांकाने नकार दिल्यानंतर कतरिनाला या चित्रपटाची ऑफर मिळाली. चित्रपटात प्रियांकाची फीस कतरिनाला दिली जात आहे. कतरिनाला चित्रपटासाठी 12 कोटी रुपये फीस दिली जातेय असे वृत्त आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.