आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 40 व्या वर्षी तिस-या बाळाची आई झाली सलमान खानसोबत झळकलेली ही अॅक्ट्रेस, गोंडस मुलाला दिला जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानसोबत 'जुडवा' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रंभा हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ती तिस-यांदा आई झाली आहे. मुलाच्या जन्माची बातमी रंभाचे पती इंद्राण यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, 'We are blessed with a baby boy. Born September 23rd at Mount Sinai Hospital, Toronto. Mother and Baby are fine. Regards, Inthiran'. रंभा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती शेवटची 2004 मध्ये आलेल्या 'दुकान: पिला हाउस' या चित्रपटात झळकली होती. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत आहे.  

 

वयाच्या 16 व्या वर्षी केले होते डेब्यू...

- 40 वर्षीय रंभाने 23 सप्टेंबर रोजी टोरंटोच्या माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. 

 

-चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यानंतर रंभाने 8 एप्रिल, 2010 रोजी बिजनेसमन इंद्राण पद्मनाथनसोबत तिरुमाला येथे लग्न थाटले. 13 जानेवारी, 2011 रोजी रंभाची थोरली मुलगी लान्या आणि 31 मार्च, 2015 रोजी धाकटी मुलगी साशाचा जन्म झाला. आता वयाच्या 40 व्या वर्षी रंभा तिस-या बाळाची आई झाली आहे. 

 

- रंभाने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डेब्यू केला होता. 1995 मध्ये ती 'जल्लाद' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आली. यानंतर ती 'दानवीर', 'जंग', 'कहर', 'जुडवां', 'सजना', 'घरवाली बाहरवाली', 'बंधन', 'मैं तेरे प्यार में पागल', 'बेटी नंबर वन', 'दिल ही दिल में'सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली. सलमानशिवाय तिने रजनीकांत, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगन, मिथुन चक्रवर्ती या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

 

हुंड्यासाठी त्रास दिल्याचा लागला होता आरोप...
हैदराबाद पोलिसांनी जानेवारी, 2017 मध्ये समन पाठवून रंभाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. रंभाच्या भावाची पत्नी पल्लवीने हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी रंभाने तिच्या नव-यासोबतच रंभा आणि इतर कुटुंबीयांच्या नावाचा उल्लेख केला होता. पल्लवीने 1999 मध्ये रंभाच्या भावासोबत लग्न केले होते.

बातम्या आणखी आहेत...