Home | Gossip | Salman Khan former chef Akhtar mia living in bhopal in bad condition

सलमान खानला ज्या 'अख्तर चाचा' च्या हाताचे अल्लू पराठे खायला आवडायचे, ते आज भोपाळमध्ये गूळ विकून करत आहेत गुजराण, खूप गरिबीमध्ये दिवस काढत आहेत 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 15, 2019, 02:37 PM IST

पिता सलीम खानपासून ते सर्व घरच्यांचे लाडके होते 'अख्तर चाचा'

 • Salman Khan former chef Akhtar mia living in bhopal in bad condition

  एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खान लहानपणी ज्या 'अख्तर चाचा' च्या हातचे बनवलेले जेवण करायचा. ते आज खूप गरिबीमध्ये दिवस काढत आहेत. ते भोपाळमध्ये गल्लोगल्ली फिरून गूळ विकावून त्यांचे गुजराण करत आहेत. अशातच एका वृत्तपत्राने त्यांचा इंटरव्यू घेतला. ज्यामध्ये त्यांनी खान फॅमिलीशी असलेल्या आपल्या संबंधांविषयायी सांगितले. ते सलमानच्या जन्मापासून ते 'मैनें प्यार किया' च्या रिलीज पर्यंत सोबत होते.

  तब्येत बिघडल्यामुळे मुंबईहुन भोपाळला परतले अख्तर...
  अख्तर यांनी सांगितले की, त्यांचो तब्येत बिघडल्यामुळे ते भोपाळला परत आले होते. मात्र या गोष्टीची माहिती सलमानला नव्हती की, त्याचे 'अख्तर चाचा' भोपाळमध्ये राहत आहेत. ते खान परिवाराचे आवडते होते. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांची एक इच्छा आहे त्यांना एकदा सलमान खानला भेटायचे आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला त्यांच्या हाताचे अल्लू पराठे खूप आवडतात.

  अशी मिळाली होती खान कुटुंबात नोकरी...
  अख्तर यांनी सांगितले की, ते पूर्वी एमपीचे रायसेनमध्ये हामीद खां खंडेरेयांच्याकडे काम काम करायचे हामीद, सलीम खान यांचे भाऊजी होते. जेव्हा ते इंदूरला शिफ्ट झाले तेव्हा सलमानने त्यांना बोलावून घेतले. ज्यामुळे अख्तर यांना त्याच्या घरी काम मिळाले. लहानपणी सलमानला सांभाळण्याची जबाबदारी देखील त्यांचीच होती.

Trending