Home | Party | Salman Khan Fun With Nephew Aahil At Loveratri Trailer Launch Event

मेहुण्याच्या निमित्ताने दीर्घ काळापासून हीटच्या प्रतिक्षेत असलेल्या भावांना सलमानने आणले एकत्र

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 07, 2018, 12:02 PM IST

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट 'लवरात्री'चा ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला आहे.

 • मुंबईः अभिनेता सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट 'लवरात्री'चा ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलर लाँच इव्हेंटला सलमानसह त्याची बहीण अर्पिता, भाचा आहिल, सोहेल खान, वरीना हुसैन आणि आयुष शर्मा उपस्थित होते. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, आयुष शर्मासोबत सलमान तब्बल दहा वर्षांनी त्याचे धाकटे भाऊ सोहेल खान आणि अरबाज खान यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अरबाज आणि सोहेल दीर्घ काळापासून एका हीट चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. चित्रपटात सोहेल आणि अरबाज यांनी पोलिसांची भूमिका वठवसी आहे. हगा चित्रपट दिग्दर्शक अभिराज मीनावाला यांनी दिग्दर्शित केला आहे.

  अखेरचे 'जाने तू या जाने ना'मध्ये एकत्र दिसले होते अरबाज-सोहेल...

  अरबाज आणि सोहेल अखेरचे 2008 मध्ये आलेल्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटात आमिर खानचा भाचा इमरान खान आणि जेनिलिया डिसुजा मेन लीडमध्ये होते. तर सलमान आणि अरबाज यांनी 'हॅलो ब्रदर' आणि 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. तर सलमान आणि सोहेल खान 'वीर' आणि 'ट्यूबलाइट'मध्ये एकत्र झळकले होते.

  ट्रेलर लाँचला भाचा आहिलसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसला सलमान...

  ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमान खान त्याचा भाचा आहिल (आयुष-अर्पिताचा मुलगा) सोबत खेळताना दिसला. कधी सलमान आहिलच्या हातात माइक देताना दिसला तर कधी त्याच्यासोबत इव्हेंटस्थळी फिरताना दिसला. 'लवरात्री' हा चित्रपट यावर्षी 5 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. गुजराती पार्श्वभूमी असलेला हा रोमँटिक ड्रामा धाटणीचा चित्रपट असून यामध्ये एका जोडप्याची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. नवरात्रीच्या काळात हे जोडपं एकमेकांच्या प्रेमात पडतं.


  पुढील स्लाईड्सवर बघा, ट्रेलर लाँच इव्हेंटची खास छायाचित्रे...

 • Salman Khan Fun With Nephew Aahil At Loveratri Trailer Launch Event
 • Salman Khan Fun With Nephew Aahil At Loveratri Trailer Launch Event
 • Salman Khan Fun With Nephew Aahil At Loveratri Trailer Launch Event

Trending