आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Gets Emotional Remembering His Special Friend And Marathi Actor Laxmikant Barde

सारेगामापा लिटिल चॅम्प्स : खास मित्र लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आल्याने भावुक झाला सलमान खान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : सलमान खानने अशातच सिंगिंग रियलिटी शो 'सारेगामापा लिटिल चॅम्पसचा स्पेशल एपिसोड शूट केला. यादरम्यान जेव्हा कन्टेस्टंट ऋतिक गुप्ताने चित्रपट 'साजन' चे गाणे 'तुमसे मिलने की तमन्ना है' यावर परफॉर्म केले तर सलमानला आपले को-अॅक्टर दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आली आणि तो इमोशनल झाला. हे गाणे या दोघांवरच चित्रित करण्यात आलेले आहे.  

 

सलमान म्हणाला - लक्ष्मीकांत आहेत 'मैंने प्यार किया'च्या यशाचे कारण... 
परफॉर्मन्स पाहिल्यानंतर 53 वर्षांचा सलमान म्हणाला, "या गाण्याशी अनेक सुंदर सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. हे 'साजन' चित्रपटातील गाणे आहे, जो खूप हिट झाला होता. फिल्ममध्ये हे माझे इंट्रोडक्शन सॉन्ग होते आणि हे माझंटावर अमी माझा खास मित्र लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित केले गेले होते. मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आणि मला वाटते की, 'मैंने प्यार किया' च्या यशामागचे एक मोठे कारण ते होते. हे गाणे मला नेहमी त्यांची आठवण करून देते. दुर्दैवाने ते आता आपल्यासोबत नाहीत." 

 

15 वर्षांपूर्वी झाले होते लक्ष्मीकांत यांचे निधन... 
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया', 'साजन', 'हम आपके हैं कौन' आणि 'हम तुम्हारे हैं सनम' अशा चित्रपटात काम केले होते. 16 डिसेंबर 2004 ला किडनीशी निगडित आजारामुळे त्यांचे निधन झाले होते. त्यावेळी ते 50 वर्षांचे होते. लक्ष्मीकांत मराठी अभिनेते होते आणि 'मैंने प्यार किया' हा हिंदी हिंदीतील त्यांचा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये सलमानने लीड अॅक्टर म्हणून पहिल्यांदा काम केले होते.