आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने राणू मंडलला गिफ्ट केले 55 लाखांचे घर, सलमांच्या 'दबंग 3' या चित्रपटातही गाऊ शकते राणू 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आपल्या सुरेल आवाजाने स्टेशनपासून ते हिमेश रेशमियाच्या स्टूडियोपर्यंत पोहोचलेली राणू मंडल स्टार बनली आहे. आधी तिला हिमेश रेशमियाने गाण्याची ऑफर दिली आणि आता खुद्द सलमान खाननेही तिची मदत केली आहे. सोशल मीडियावर अशी बातमी व्हायरल होत आहे की, सलमानने राणूला एक आलीशन घर दिले आहे. या घराची किंमत 55 लाख रुपये सांगितली जात आहे. एवढेच नाही तर हादेखील दावा केला जात आहे की, सलमानने आपला आगामी चित्रपट 'दबंग 3' मध्ये राणूला गाण्याची संधीदेखील दिली आहे. मात्र याबाबतीत सत्य अद्याप समोर आलेले नाही. कारण सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...