आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दबंग -3' चा को-स्टार किच्चा सुदीपवर इम्प्रेस झाला सलमान, भेट दिली पावणे दोन कोटींची BMW M5

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: सलमान खान त्याच्या जवळच्या आणि प्रियजनांना खुश करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अलीकडेच आलेल्या 'दबंग 3' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकलेला साऊथ स्टार कीच्चा सुदीपसाठीही सलमानने असेच काहीसे केले. किच्चावर सलमान इतका प्रभावित झाला की, त्याने त्याला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली. सलमान स्वत: ही कार घेऊन किच्चाच्या घरी पोहोचला, याचा उल्लेख किच्चाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केला आहे.

किच्चाने लिहिली इमोशनल नोट : ही भेट मिळाल्यामुळे किच्चाला इतका आनंद झाला की, त्याने इंस्टाग्रामवर गाडीसोबतचे फोटो शेअर करून भावनिक पोस्ट लिहिली. किच्चाने लिहिले की, “जर तुम्ही चांगले केले तर तुमच्यासोबतही चांगलेच घडते. याचा प्रत्यय मला आला आहे. सलमान सर बीएमडब्ल्यू एम 5 बरोबर माझ्या घरी आले, ही सुंदर भेटवस्तू दिल्याबद्दल आणि मला आणि माझ्या कुटुंबाला खूप प्रेम दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद. तुमच्याबरोबर काम करणे हा सन्मान आहे आणि तुम्ही आमच्या घरी आलात त्याबद्दल धन्यवाद.” या कारची किंमत सुमारे 1.7 कोटी आहे.

यापूर्वी सलमानने आपले जॅकेट किच्चाला भेट म्हणून दिले होते. किच्चा हा दक्षिणेचा एक सुप्रसिद्ध स्टार आहे. 'दबंग 3' हा बॉलिवूडमधील त्याचा पहिला चित्रपट आहे.   

बातम्या आणखी आहेत...