आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Gives Eid Dawat Party Many Celebrity Inluding Shatrughan Sinha Attended The Celebration

सलमानने दिली ईदची दावत, कतरिना, जॅकलिन सेलेब्रेशनसाठी पोहोचल्या, मुलगी सोनाक्षीसोबत शत्रुघ्न सिन्हादेखील दिसले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानने गुरूवारी आपल्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये ईदची दावत दिली. दावतमध्ये सलमानचे सर्व मित्र आणि संपूर्ण खान कुटुंब सामील झाले होते. कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा आणि यूलिया वंतूरदेखील पार्टीमध्ये दिसली. सोनाक्षीचे पिता शत्रुघ्न सिन्हा हेदेखील येथे स्पॉट झाले. पार्टीमध्ये सलमान ब्लू शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. तसेच बाकी सर्व पाहुणे ट्रेडिशनल लूकमध्ये येथे दिसले. कतरिनाने इंस्टाग्रामवर आपला ईद लुक शेयर केला. कॅट ऑरेंज सलवार-कमीजमध्ये दिसली. फोटो शेयर करून कॅटने लिहिले 'ईद मुबारक.' 

 

कतरिना कैफची इंस्टापोस्ट... 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Eid Mubarak 🌙

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

याव्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिसनेदेखील इंस्टाग्रामवर आपला ईद लुक शेअर केला. जॅकलिनने पीच कलरचा लेहंगा घातला होता. फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिले, 'आशा आहे की, सर्वांची ईद आंनदाने भरलेली आहे. चला आनंद वाटुया. ईद मुबारक.'

 

 

ईदच्या प्रसंगी सलमानने घराच्या बाल्कनीमधून फॅन्सला ईदच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान सलमान ट्रेडिशनल लूकमध्ये दिसला. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजामा घातला होता. त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ अपलोड केला गेला आहे, ज्यामध्ये सलमान फॅन्सला ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.  

 

 

चित्रपट करत आहे बंपर कमाई... 
ईदला रिलीज झालेला सलमान खानचा चित्रपट 'भारत' ने पहिल्या दिवशीच 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट ईदला रिलीज झालेल्या सलमानच्या सर्व चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनचा नवा रेकॉर्ड बनवण्यात यशस्वी झाला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड 'सुल्तान'च्या नावे होता. ज्याने ओपनिंग डेला 36.54 कोटींची कमाई केली होती. 'भारत' ने दुसऱ्या दिवशी 30 कोटींची कमाई केली. चित्रपटाने एकूण 73.30 कोटी एवढे कलेक्शन केले. 

बातम्या आणखी आहेत...