आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दबंग' अंदाजात आयुष्य जगायचे सलमान खानचे आजोबा, इंदूरचे DIG होते, पण कधीच घातला नाही यूनिफॉर्म, लोक सर किंवा साहेब नाही तर मियां म्हणून मारायचे हाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सुपरस्टार सलमान खान 27 डिसेंबर रोजी वयाची 53 वर्षे पुर्ण करतोय. सलमान खानचे आजोबा DIG होते. जासिम खान यांच्या 'बीइंग सलमान' मध्ये सलमानचे आजोबा अब्दुल राशित खानविषयी सविस्तर माहिती आहे. पुस्तकानुसार, इंदूर एक राज्य होते तेव्हाचा तो काळ होता. पुस्तकात लिहिले आहे की, 1915 मध्ये सलमान खानचे आजोबा अब्दुल राशित खानने पोलिस सर्व्हिस ऑफ होलकर जॉइन केली. त्यांना डायरेक्टर डिप्टी सुपरीटेंडेट ऑफ पोलिसची पोस्ट देण्यात आली होती. पण त्यांचे रिटायरमेंट DIG च्या पोस्टने झाले होते. त्या काळात आयजीनंतर पोलिस डिपोर्टमेंटची दूसरी मोठी पोस्ट असायची. पुस्तकामध्ये आजोबा नईम खान यांचा दाखला देत लिहिण्यात आले आहे की, अब्जुल राशिद खान यांची प्रतिमा 'दबंग' चित्रपटातील सलमान खानप्रमाणेच होती. 

 

कधी-कधीच घालायचे यूनिफॉर्म 
- जासिम खान यांच्या पुस्तकात सलमानचे काका नईम खान यांचा दाखला देत लिहिण्यात आले आहे की, अब्दुल राशित खान कधी-कधीच यूनिफॉर्म घालायचे. त्यांना उघड्या जीपमधून फिरायला जास्त आवडायचे. सर्वात विशेष म्हणजे त्यांचे सबऑर्डिनेट्स कधीच त्यांना सर किंवा साहेब म्हणून बोलवायचे नाही. तर जास्तीत जास्त लोक त्यांना मियां म्हणून हाक मारायचे. 

 

घरात इलेक्ट्रिसिटीही नव्हती 
- 'बीइंग सलमान'मध्ये नईम खानने सांगितले आहे की, "आमच्या घराबाहेर आज DIG सारखी सुरक्षा नसायची. अर्दली किंवा ऑफिशियल नोकरही नव्हते. घरातील सर्व कामे वृध्द महिला आणि हाउसकीपर्स करायचे. आमचे वडील खुप मोठे ऑफिसर आहेत, याची जाणिव आम्हाला कधीच झाली नाही. आम्ही मंडलेश्वरमध्ये राहायचो, येथे वीज नव्हती. ते एकटे राहायचे आणि फक्त एक लालटेन त्यांच्यासाठी पुरेसी होती. ते कधीच आपल्या घराला कुलूप लावायचे नाही. त्याच्याविषयी विशेष गोष्ट म्हणजे, ते कधीच सोबत रिव्हॉल्वर ठेवायचे नाही. डंडा हेच त्यांचे मुख्य हत्यार होते."

 

इंदूरमध्ये त्या काळात होते फक्त DIG
त्या काळात इंदूर राज्यात फक्त चार DIG असायचे आणि नॉन ब्रिटिशांना मिळाही ही हायएस्ट रँक होती. DIG की रिपोर्टिंग आयजीला असायची. अब्दुल राशित खान यांची रिपोर्टिंग त्या काळाचे आयजी बेसिल चुर्टोन यांना होती.
 

बातम्या आणखी आहेत...