आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा अडचणीत सापडला सलमान खान, पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली तक्रार, पाकिस्तानशी संबंधीत आहे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क. सलमान खान पुन्हा एकदा नवीन अडचणीत सापडला आहे. यावेळी प्रकरण हे पाकिस्तान आणि झेंड्यासंबंधीत आहे. 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या सलमानवर पंजाबमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारत चित्रपटाच्या एका सीनमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकावण्यात येतो. हा सीन पंजाबच्या एका गावात शूट करण्यात आला आहे. पाकिस्तानचा झेंडा त्यांच्या गावात फडकावल्यामुळे तेथील लोक नाराज झाले आहेत. त्यांनी याचा विरोध केला आणि सलमान खान विरुध्द पोलिसात तक्रार दाखल केली. 

 

ग्रामिण लोक म्हणतात की, चित्रपटाच्या शूटिंगसाठीही पाकिस्तानचा झेंडा भारतात फडकावणे चुकीचे आहे. हा भारताचा अपमान आहे. सलमान ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलला गावतील लोकांनी घेराव घातला होता. याविषीयी आम्ही यूपी पोलिसचे डीजी राहिलेले (रिटायर्ड) विक्रम सिंह यांच्याशी बातचित केली. त्यांनी झेंड्याविषयीचे नियम सांगितले. सलमान बरोबर आहे की, चुकीचा याविषयीचे नियम त्यांनी सांगितले. 

 

काय आहेत नियम 
- सिंह यांनी सांगितले की, जर एखाद्या ड्रामासाठी पाकिस्तानचा झेंडा फडकावला तर हे चुकीचे नाही. पण यामध्ये पाकिस्तानची वाहवाही आणि प्रशंसा करणे चुकीचे आहे. ड्रामा व्यतिरिक्त देशात कुठेही पाकिस्तानची प्रशंसा करत झेंडा फडकावला तर हा अपराध आहे. 
- असे केल्याव आयपीसी कलम 153 नुसार केस दाखल होते आणि तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. या अपराधाचा दंडही आहे. भारतीय जमीनीवर कुणीही पाकिस्तानला महिमामंडित करु शकत नाही. ड्रामामध्येही पाकिस्तानची वाहवाही केली जाऊ शकत नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...