आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Is Going To Be Uncle For Second Time, Arpita Khan Sharma Is Going To Be A Mother Again!

दुसऱ्यांदा मामा होणार आहे सलमान खान, अर्पिता खान शर्मा पुन्हा एकदा होणार आहे आई !

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खान पुन्हा एकदा मामा होणार आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सलमानची बहीण अर्पिता दुसऱ्यांदा आई होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील दिवसांमध्ये तिला बऱ्याचदा वांद्र्याच्या एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या डॉक्टर्सची भेट घेताना स्पॉट केले गेले. मात्र अद्याप सलमान खानच्या कुटुंबियांकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही.  

 

2016 मध्ये झाला होता आहिलचा जन्म... 
- अर्पिता खानने 2014 मध्ये आपला लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्न केले होते. 2016 मध्ये तिचा मुलगा आहिलचा जन्म झाला होता. लग्नानंतर आयुषने आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. त्याने सलमानच्या गाइडन्समध्ये आपली बॉडी आणि अभिनय कौशल्यावर काम केले. सलमाननेच त्याला अपील प्रोडक्शन हाउसचा चित्रपट लव्हयात्रीने लॉन्च केले. 

 

- चित्रपट फ्लॉप ठरला पण सलमानने आयुषला घेऊन पुन्हा एकदा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तो त्याला लवकरच मराठी चित्रपट 'मुलसी' च्या हिंदी रिमेकमध्ये कास्ट करणार आहे. हा चित्रपट पुण्याच्या मुलसी तहसीलचाक सत्य घटनेवर आधारित आहे. 

 

आहिलला सोशल मीडियावर लोकांनी केले होते ट्रोल... 
एप्रिल महिन्यात एका व्हिडीओवरून आहिल शर्माला ट्रोल केले गेले होते. त्याला पोलिओ पीडित म्हणून त्याची खिल्ली उडवली गेली होती. अर्पिताने मुलगा आहिलच्या तिसऱ्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला होता, ज्यावर ट्रोलर्सने आहिलला पोलियो पीडित मुलगा म्हणले. या कमेंट्सवर अर्पिता खूप नाराज झाली आणि तिने सोशल मीडियावर हेटर्सची शाळा घेतली. 

बातम्या आणखी आहेत...