आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan Jacqueline Fernandes Arrives In Bhopal; Will Announce IIFA Dates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान खान - जॅकलिन फर्नांडिस भोपाळला पोहोचले; आयफाची अनाउन्समेंट करतील, पहिले तिकीट खरेदी करतील कमलनाथ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ : सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस भोपाळला पोहोचले. यावेळी आयफा अवॉर्ड्सचे आयोजन मध्यप्रदेशमध्ये होणार आहे. याची अधिकृत घोषणा करण्यासाठी सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस शहरात आले आहेत. ते येथे आयफा अवॉर्ड्सच्या तारखांची घोषणा करतील. कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता मिंटो हॉलमध्ये सुरु होईल. या निमित्त मुख्यमंत्री कमलनाथ, आयोजक विज़क्राफ्टचे एंड्रे टिमिन्स, सब्बस जोसफ आणि विराफ सरकारीदेखील उपस्थित राहतील. येथेच कमलनाथ आयफा अवार्ड्सचे पहिले तिकीट खरेदी करतील. अवार्ड्स 2019 मध्ये मुंबईमध्ये झाले होते. यापूर्वी भारताबाहेर झाले आहे. 

आयफा 2020 चे आयोजन 27 ते 29 मार्चदरम्यान केले जाईल. एक दिवस भोपाळ आणि बाकी आयोजन इंदूरमध्ये होईल. आयफा अवार्डमध्ये 400 पेक्षा अधिक कलाकारांसह संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमधून पाच हजारपेक्षा जास्त लोक सामील होतील. आयोजनासाठी नेहरू स्टेडियम सुमारे ठरलेच आहे. आयोजक कंपनी विजक्राफ्टने होळकर स्टेडियम आणि डेली कॉलेजचे लोकेशन्सदेखील पहिले. 

90 देशांमध्ये होईल आयफा अवार्ड 2020 चे प्रसारण... 

माहितीनुसार, आयफा अवार्ड्स सोहळ्याचे प्रसारण जगातील 90 देशांमध्ये केले जाईल. ज्यावर 30 कोटी रुपये खर्च होतील. तीन दिवसांचा हा सोहळा एक दिवस भोपाळ आणि दोन दिवस इंदूरमध्ये होईल. पहिल्या आयफा अवार्ड्स सोहळ्याचे आयोजन 2000 मध्ये लंडनमध्ये केले गेले होते.