आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहीण श्वेताला बॉलिवूडमध्ये लाँच करणार सलमान, पतीशी घटस्फोट घेतल्यामुळे होता नाराज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई : सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिराने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. अलीकडेच तिचे ट्रेनिंग पूर्ण झाले. अभिनय आणि शॉर्ट फिल्म या क्षेत्रात येण्यासाठी श्वेताने खूप मेहनत घेतली आहे. तिची एक शॉर्ट फिल्म 'स्पॉटलेस' सध्या खूप चर्चेत आहे. या शॉट फिल्ममध्ये सोनू निगम अभिनेता म्हणून दिसणार आहे. 

 

 2014 मध्ये श्वेताचे अभिनेता पुलकित सम्राटसोबत लग्न झाले होते. या लग्नाला सलमान खान उपस्थित होता. पण लग्नाच्या काही दिवसांनी श्वेता आणि पुलकित यांचे मार्ग वेगळे झाले. त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला.पण सलमान खान या घटस्फोटाने खूप नाराज होता. त्यानंतर पुलकित सम्राटला चांगले चित्रपट मिळणे अवघड झाले होते.    
         

या घटस्फोटाचे कारण पुलकित सम्राटचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले गेले होते. अभिनेत्री यामी गौतमसोबत पुलकित सम्राटाचे अफेअर असल्याची चर्चा होती. यामी आणि पुलकितने 'सनम रे', 'जुनुनीयत' या चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. पण यामी-गौतमच्या अफेअरची चर्चा मात्र खुप रंगली. 
           

याचदरम्यान श्वेता रोहिराने आपले अभिनय कौशल्य आणि आपले व्यक्तिमत्व याकडे पूर्ण लक्ष दिले आणि भाऊ सलमानला दिलेल्या वचनानुसार शॉर्ट फिल्ममधून स्वतःला सिद्धही केले.  आता सलमान बहीण श्वेताला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसला आता श्वेताच्या बॉलिवूड पदार्पणासाठी एका चांगल्या कथेची गरज आहे.  त्यामुळे सलमानचा मेहुणा आयुष शर्मानंतर आता त्याची बहीण श्वेतासुद्धा मोठ्या पडद्यावर झळकणार हे निश्चित झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...