आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Lookalike In Karachi, Salman Khan Lookalike, Salman Khan, Bollywood Celebs, Bollywood Latest News

पार्किंगमध्ये गाड्या लावताना दिसला सलमानचा डुप्लिकेट, हेअरस्टाइपासून बॉडीपर्यंत सर्व काही मॅचिंग, सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून लोक म्हणाले - भाई कराचीमध्ये काय करताय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सलमान खानसारख्या दिसणा-या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून कुणालाही भुरळ पडेल. व्हिडिओमध्ये सलमानसारखी दिसणारी व्यक्ती पाकिस्तानच्या कराचीमधील एका मार्केटच्या पार्किंगमध्ये गाड्या लावताना दिसतेय. या व्यक्तीची हेअरस्टाइल आणि फिजिक हुबेहूब सलमान खानसारखे आहे. या व्यक्तीने गॉगल लावला आहे आणि ऑफ व्हाइट कलरचा टी-शर्ट घातलेला आहे. हाजी मूसा सूर्या नावाच्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट करणा-याने सलमानसारख्या दिसणा-या व्यक्तीची काहीच माहिती दिलेली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून सलमानला ट्रोल केले जात आहे. एकाने कमेंट करत लिहिले - 'बालपणी तुमची ताटातूट तर झाली नव्हती' तर एका यूजरने विचारले 'भाई तुम्ही कराचीच्या बोलटॉन मार्केटमध्ये काय करत आहात?' एका यूजरने लिहिले - 'भाई तुम्ही कराची येथे आले सांगितलेही नाही' 

बातम्या आणखी आहेत...