आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रुमसद्धा, \'भारत\'च्या निर्मात्यांनी शेअर केले Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खान सध्या माल्टामध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान 'भारत'चे निर्माते निखिल नमित यांनी सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅन अतिशय लग्झरिअस दिसतेय. व्हॅनिटीचा आउटलूकसुद्धा जबरदस्त आहे. 

 

हे आहे सलमानच्या व्हॅनिटीचे वैशिष्ट्य... 

- सलमानच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रूमसुद्धा असून येथे तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि रिहर्सल करतो.

- व्हॅनमध्ये शॉवर आणि टॉयलेटव्यतिरिक्त मूडनुसार अॅडजस्ट होणारी लाइटिंगसुद्धा आहे. 

 

सलमानला ऑफर झाला होता 'धूम-4'
- 'धूम-4' विषयी अनेक बातम्या येत आहेत. सुरुवातीला वृत्त आले होते की, सलमान या चित्रपटात झळकणार आहे, पण नंतर प्रॉडक्श हाऊस (YRF) ने याचा इंकार केला होता.

- अभिनेता शाहरुख खान आता या चित्रपटात काम करणार असल्याचेही म्हटले जात आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत काहीही समोर आलेले नाही. लेटेस्ट अपडेटनुसार रणवीर सिंह किंवा रणबीर कपूर या चित्रपटात दिसू शकतात. 

- धूम सीरिजचा चौथा भाग दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करणार आहे. रणवीर किंवा रणबीर यांची चित्रपटात पॉझिटिव्ह भूमिका असेल. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे खास फोटोज...

बातम्या आणखी आहेत...