Bollywood / सलमान खान - माधुरी दीक्षित पुन्हा थिरकले त्यांच्या सुप्रसिद्ध गाण्यावर, पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन 

'हम आपके हैं कौन' ला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केला गेला होता कार्यक्रम 

दिव्य मराठी

Aug 10,2019 01:09:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा सुपरहिट चित्रपट 'हम आपके हैं कौन' ला रिलीज होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 5 ऑगस्ट 1994 ला रिलीज झाला होता. या चित्रपटात प्रेम आणि निशा ही जोडी लोकांना खूप आवडली होती. त्यासोबतच दोघांची लव्हस्टोरी, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील सलमान आणि माधुरीचा डान्स लोकांना विशेष आवडला. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये एका ग्रँड इव्हेंटमध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टसहित चित्रपटाशी निगडित सर्व लोक पोहोचले आणि त्यांनी हा दिवस साजरा केला. यावेळी सलमान आणि माधुरीने पुन्हा एकत्र येऊन त्यांच्या सुपरहिट गाण्यावर डान्स केला.

पाहा सलमान आणि माधुरीचा डान्स...

'हम आपके हैं कौन' हा चित्रपट 'या' जुन्या चित्रपटाचा आहे रिमेक...
या चित्रपटामध्ये सलमान-माधुरी यांच्यासोबतच मोहनीश बहल, रेणुका शहाणे, अनुपम खेर, आलोक नाथ आणि रीमा लागू यांसारख्या दमदार कलाकारांनी काम केले होते. हा चित्रपट देशात 100 कोटींचा व्यवसाय करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट 1982 मध्ये आलेल्या 'नदिया के पार' चा रिमेक होता. या चित्रपटात सचिन, साधना सिंह, इंदर ठाकुर आणि मिताली यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

X