आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने चालू कार्यक्रमात उडवली शाहरुखची खिल्ली, बोलला असे काही की, लोकांना आवरलेच नाही आपले हसू : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान सध्या आपली अपकमिंग फिल्म 'भारत' मुळे चर्चेत आहे. सलमान काही दिवसांपूर्वी सउदी फिल्म फेस्टिवल अटेंड करण्यासाठी इथरा येथे पोहोचला होता. येथे एका इंटरव्यूदरम्यान सलमानला जगभरात पसरलेल्या त्याच्या फॅन्सबद्दल विचारले गेले. इंटरव्यू घेणारी महिला म्हणाली, ''तुम्ही संपूर्ण जगात फिरता, ग्रीस असो, इटली, सउदी की, इंडिया. सर्वच ठिकाणचे फॅन्स तुम्हाला पसंत करतात.'' यावर सलमान म्हणाला, 'मी माझ्या फॅन्सचे आभार मानतो आणि त्यांचा आदर करतो. त्यांनाच मी माझे खरे फॅन मानतो, जे थिएटर्समध्ये जाऊन माझे चित्रपट पाहतात. त्यानंतर सलमान म्हणाला, ''ते माझे फॅन नाहीत, जे पायरेटेड डीव्हीडी किंवा टोरंटवरून डाउनलोड करून फिल्म बघतात. ते सर्व शाहरुखचे फॅन्स आहेत.'' सलमानच्या या बोलण्यावर तिथे हजार असलेले सर्व जण खूप हसले.  

सलमान म्हणाला, कतरिना आहे त्याची आवडती हीरोइन...
इव्हेंटदरम्यान सलमानला विचारले गेले की, त्याची आवडती हीरोइन कोण आहे, तर उत्तरात त्याने कतरिनाचे नाव घेतले. कतरिना फिल्म 'भारत' मध्ये सलमानसोबत रोमान्स करतांना दिसणार आहे. फिल्म याचवर्षी ईदला म्हणजेच 5 जूनला रिलीज होणार आहे. अली अब्बास जफरच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या 'भारत' मध्ये सलमान, कतरिना यांच्याव्यतिरिक्त दिशा पाटनी, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ, तब्बू आणि नोरा फतेही हेदेखील आहेत. 

बातम्या आणखी आहेत...