आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमध्ये सलमानने उडवली रणवीरची खिल्ली, 'लग्नाला 4 दिवस झाले नाही आणि करतोय बायकोची हाजी हाजी' : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'बिग बॉस' मध्ये या वीकेंडच्या वारमध्ये म्हणजेच रविवारी 'सिंबा' स्टार रणवीर सिंह आणि सारा अली खान दिसले. यादरम्यान सारा आणि रणवीरसोबत सिंबाचे डायरेक्टर रोहित शेट्टीही दिसला. शोमध्ये एका टास्कदरम्यान सलमान खान आणि रोहित शेट्टी मिळून रणवीर सिंहची खिल्ली उडवताना दिसत आहेत. रणवीर आणि साराचा सिंबा हा चित्रपट 28 डिसेंबरला रिलीज होत आहे. 

 

रणवीर सिंह, सारा अली खान, रोहित शेट्टी आणि सलमान खान 'बिग बॉस' मध्ये थट्टा-मस्करी करत होते. यादरम्यान सलमान आणि रोहित मिळून रणवीरला एक टास्क देतात. रोहित शेट्टी म्हणतो की, रणवीर, तुला दीपिकाचा फोन येईल. कारण, दीपिकाचा एक लहेंगा सापडत नाही आणि तो तु घातला आहे असा संशत तिला आहे. तर तु आता अशी अॅक्टिंग करुन दाखव. यावर रणवीर दिलेला टास्क करतो. रणवीर फोनवर दीपिकाल म्हणतो की, 'हाय बेब, आय लव्ह यू टू, हो हो मीच घातला आहे, गुलाबी आहे, हार्ट्सवाला लहेंगा आहे. बेबी काय सांगू आता लहेंगा मला चांगला वाटतो. सर्कुलेशनसाठी चांगला आहे ना. रणवीरचे हो हो ऐकून सलमान म्हणतो की, 'लग्नाला चार दिवस झाले नाही आणि आतापासूनच हो... हो... करतोय.' यानंतर रणवीर, सारा आणि रोहित हसतात. यानंतर रणवीर आणि साराने आपल्या सिंबा चित्रपटातील 'लडकी आंख मारे' गाण्यावर सलमानसोबत डान्सही केला.'

 

तेलुगु फिल्म टेम्परचा रीमेक आहे सिंबा 
2015 मध्ये आलेला तेलुगु चित्रपट 'टेम्पर' मध्ये पोलिस ऑफिसरच्या कहानी होती. तो एका स्मगलरसोबत मिळून आपल्या पावरचा चुकीचा वापर करतो. अवैध पध्दतीने पैसा कमावतो. या चित्रपटात लीड रोल ज्यूनियर एनटीआरने प्ले केला होता. सिंबाची कथा अशीच आहे. यामध्ये ज्यूनिअर एनटीआरची भूमिका रणवीर सिंह साकारत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...