आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई. सलमान खान लवकरच कपिल शर्माच्या कमबॅक कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमध्ये दिसणार आहे. या शोची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान कपिलसोबत मस्ती करताना दिसतोय. सलमानने लग्न का केले नाही याचे कारण तो शोमध्ये सांगतोय. सलमान एक किस्सा ऐकवतो की, संजय दत्त त्याला लग्नासाठी समजावून सांगत होता. सलमान म्हणतो की, संजय मला लग्न करण्याचा सल्ला देत होते, त्यादरम्यान त्यांच्या बायकोचा फोन आला आणि ते मला थांबवून तिथून निघून गेले. एवढे ऐकूण कपिल आणि शोचे जज नवज्योत सिंह सिध्दूसोबत तिथे उपस्थित लोक खळखळून हसू लागले. म्हणजेच सलमान लग्न करायचे नाही असे म्हणत संजयची खिल्ली उडवत होता. कारण तो त्याला लग्न करण्याचा सल्ला देत होता.
अरबाजने खोलली सलमानच्या 'नो किसिंग' क्लॉजची पोल
- कपिलच्या शोमध्ये सलमानचा धाकटा भाऊ अरबाज खानने त्याच्या ऑनस्क्रीन 'नो किसिंग' क्लॉजची पोल खोलली.
- कपिल, सलमानला विचारतो की, जर एखादी नवीन अॅक्ट्रेस असेल तर तिच्यासोबत रोमँटिक सीन्समध्ये कंफरटेबल कसा होतोस.
- यावर सलमान म्हणतो की, तो ऑनस्क्रीन रोमान्समध्ये किस करत नाही, तेव्हाच अरबाज मागून म्हणतो की, "तो ऑफस्क्रीन एवढे करतो की, ऑनस्क्रीन करण्याची गरज पडत नाही."
- अरबाजचे बोलणे ऐकूण सर्व हसू लागतात तर सलमान लाजून आपला चेहरा लपवतो.
- कपिलने आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर जबरदस्त पध्दतीने कमबॅक केले. शोची पहिली गेस्ट 'सिंबा'ची टीम रणवीर सिंह, सारा अली खान आणि रोहित शेट्टी होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.