Home | News | Salman Khan race with horse video viral

सलमान खानने शर्यतीत घोड्याला टाकले मागे, व्हायरल झाला शर्यतीचा व्हिडिओ

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 24, 2019, 02:53 PM IST

'इंशाअल्लाह' आणि 'दबंग 3' मध्ये दिसणार सलमान

  • Salman Khan race with horse video viral

    बॉलीवूड डेस्क - 'भारत' चित्रपटानंतर सलमान खान 'इंशाअल्लाह' आणि 'दबंग 3' मध्ये दिसणार आहे. सलमान खान सध्या चित्रपटांपासून दूर आपले आरोग्य आणि फिटनेसवर लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारा सलमान नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकतेच आपल्या ट्विटर अकाउंटवर घोड्यासोबतच्या शर्यतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमानची एनर्जी बघण्याजोगी आहे. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच चर्चेचा विषय बनला आहे.

    सलमान खानने आपल्या व्हायरल व्हिडिओत घोड्यासोबत शर्यत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आपल्या ट्विटर पोस्ट करत सलमानने लिहिले की, 'ओव्हरपावर हॉर्स पावर.....मजेदार.' सलमान खान फिटनेसच्या शर्यतीत नेहमीच पुढे राहतो याचा पुरावा त्याचा हा व्हिडिओ देतो.

Trending