आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: सलमान खान सध्या 'दस का दम 2' हा गेम शो होस्ट करतोय. यावेळी तो त्याच्या आयुष्यातील काही खुलासेही करत आहे. त्याने नुकतेच सांगितले की, शालेय दिवसात तो आपल्या टीचरसोबत फ्लर्ट करायचा. शो दरम्यान त्याने कंटेस्टेंटला प्रश्न केला होता की, स्कूल टीचरसोबत किती टक्के भारतीय पहिल्या प्रेमात पडतात? हा प्रश्न विचारल्यानंतर सलमानने स्विकारले की, त्याने आपल्या स्कूल टीचरसोबत फ्लर्ट केले आहे.
टीचरला सायकलवर घरी सोडायला जात होता सलमान
सलमानने शो दरम्यान सांगितले की, स्कूल टीचरवर क्रश असणे मोठी गोष्ट नाही. परंतू जास्तीत जास्त लोक हे स्विकार करत नाही. सलमान म्हणाला "मी माझ्या स्कूल टीचरसोबत खुप फ्लर्ट करायचो हे सांगायला मला काहीच हरकत नाही." सलमानने सांगितले की, स्कूल टीचरने त्याच्या सायकलच्या डंड्यावर बसावे म्हणून तो त्याच्या स्कूल टीचरला सायकलवर घरी सोडायला जायचा. सलमान सध्या डायरेक्टर अली अब्बास जफरच्या 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कतरिना कैफही प्रमुख भूमिकेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.