आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Said About Priyanka Chopra,"It Is A Very Difficult Thing To Leave A Big Movie For The Wedding"

प्रियांका चोप्राच्या भारत सोडण्याबद्दल बोलला सलमान खान, म्हणाला - 'लग्नासाठी एक मोठा चित्रपट ठोकरने खूप कठीण बाब आहे' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचा चित्रपट 'भारत' 5 जूनला ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. या फिल्मचे मुख्य पात्र कुमुदचा रोल कतरिना कैफने केला आहे. पहिले सांगितले जात होते की, या रोलसाठी सलमानची पहिली पसंती प्रियांका चोप्रा होती. पण आता सलमानने स्वतः हे स्पष्ट केले आहे की, प्रियंकाने स्वतः कुमुदच्या रोलसाठी अप्रोच केले होते.  

 

एका प्रेस मीटदरम्यान सलमानने सांगितले की, 'प्रियांका या फिल्मसाठी खूप इंटरेस्ट दाखवत होती. प्रियांका 20 दिवसांसाठी भारतात होती, तिने अलीला फिल्मसाठी फोनदेखील केला होता. पण अचनाक निक आला आणि तिने लग्नाचा प्लॅन बनवला.'

 

सलमान म्हणाला - प्रियांकाने मला सांगितले की, निकने तिला लग्नासाठी प्रपोज केले आहे. तर तारखांचा घोळ होऊ शकतो. तर मी तिला म्हणालो ठीक आहे. तू लग्न कर आम्ही दोन - तीन दिवस सांभाळून घेतो. पण नंतर तिने चित्रपटापासून स्वतःला वेगळेच करून घेतले. प्रियांका एक हार्डवर्किंग अभिनेत्री आहे. लग्नासाठी आपल्या करियरची एक मोठी फिल्म सोडण्यासाठी खूप गट्स लागतात. सलमाननुसार, प्रियंकाला जे योग्य वाटले तिने ते केले आणि कतरिनाला जे मिळाले ते ती डिजर्व करत होती.