आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Said, 'Katrina Should Get Married And Give Birth To Children' During The Promotion Of 'India'

'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान म्हणाला सलमान खान - 'कतरिनाने लग्न करून मुलांना जन्म दिला पाहिजे'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचे म्हणणे आहे की, कतरिना कैफने लग्न करून मुलांना जन्म दिला पाहिजे. झाले असे की, तो आणि कतरिना एका एंटरटेन्मेंट वेबसाइटवर आपली अपकमिंग फिल्म भारतचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान जेव्हा सलमानला विचारले गेले की, कतरिनासाठी पर्यायी करियर म्हणून तो काय करण्याचा सल्ला देईल. उत्तरात सलमान म्हणाला "तिने लग्न केले पाहिजे आणि मुलांना जन्म दिला पाहिजे."

 

कतरिनाने टोकले तर म्हणाली - 'लग्नासाठीही प्रयत्न गरजेचे...' 
जेव्हा कतरिनाने टोकून सलमानला म्हणाली की, प्रश्न प्रोफेशनल लाइफ जसे की डॉक्टर किंवा इंजीनियर बनण्याबद्दल विचारले गेले होते. पण सलमान आपल्या गोष्टीवर असून होता. तो म्हणाला, "लग्न आणि मुलांसाठीही खूप प्रयत्न करावे लागतात." सलमान आणि कतरिनाने पहिल्यांदा 'मैंने प्यार क्यों किया' (2005) मध्ये काम केले होते. यांनतर ते 'पार्टनर', 'युवराज', 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या सुमारे अर्धा डझन चित्रपटांमध्ये काम केले. अली अब्बास जफरच्या डायरेक्शनमध्ये बनलेली त्यांची पुढची फिल्म 'भारत' 5 जूनला रिलीज होणार आहे.  

 

लग्नाच्या प्रश्नावर कतरिनाने आधीच दिले आहे स्टेटमेंट... 
अशातच जेव्हा 35 वर्षांची कतरिना कैफ अरबाज खानच्या चॅट शोमध्ये पोहोचली होती, तेव्हा तिला विचारले गेले की, लग्नाबद्दल तिच्या काय प्लॅन आहे ? तर ती म्हणाली होती, "काही अंदाज नाही, मी प्रत्येकदिवशी वेगवेगळ्या पद्धतीने जगते. पूर्ण आयुष्य अप्रत्याशित आहे. आपळुणला माहित नसते की, कधी काय होईल." मात्र यादरम्यान कतरिना म्हणाली होती की, ती लग्न आणि कुटुंब वाढवण्यात विश्वास आहे आणि एके दिवशी ती या बंधनात नक्की बनधली जाईल.

 

स्वतःच्या लग्नाच्या प्रश्नावर हे म्हणाला सलमान... 
एका इंटरव्यूदरम्यान 53 वर्षांच्या सलमानला विचारले गेले होते की, तो कधी लग्न करून स्वतःचे कुटुंब सुरु करणार आहे. उत्तरात तो म्हणला, "मला मुले हवी आहेत, पण मुलांसोबत आई येते. मला आई नको आहे, पण त्यांना (मुलांना) त्याची गरज असते. पण माझ्याकडे त्यांची काळजी घेण्यासाठी पूर्ण गाव आहे. कदाचित मी अशी स्थिती बनवू शकेन, जी सर्वांसाठी फायदेशीर असेल."