आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Said That The Reason For Not Getting Married Is : 'No One Has Proposed Me Yet'

खुलासा : सलमान खानने सांगितले लग्न न होण्याचे कारण, म्हणाला - 'आतापर्यंत कुणी प्रपोजच केले नाही...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खान 53 वर्षांचा आहे, तरीही तो आजही बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. सलमानच्या लगांविषयी नेहमी चर्चा होत असतात. पण त्याने अद्याप लग्न केले नाही. फिल्म 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान त्याने सांगितले की, त्याला आतापर्यंत कोणत्याही मुलीने लग्नासाठी प्रपोजच केले नाही. त्यामुळे त्याचे लग्न होऊ शकले नाही.  
 

कँडल लाइट डिनरदेखील आहे लग्न न होण्याचे कारण... 
झाले असे की, फिल्म 'भारत'मध्ये कतरिना कैफ सलमानला लग्नाचे प्रपोजल देताना दिसते आहे. यावर जेव्हा त्याला विचारले गेले की, कधी खऱ्या आयुष्यात असे एखादे प्रपोजल त्याला मिळे आहे का ? यावर सलमान म्हणाला, 'आतापर्यंत त्याला कधीच कुणी समोरून असे लग्नासाठी प्रपोज केले नाही.' याचे कारण सांगत तो म्हणाला - ' मी कँडल लाइट डिनर करत नाही. जे कँडल लाइट डिनर केले असते तर मला प्रपोजल मिळाले असते. तसेही कँडल लाइटमध्ये मला जेवण दिसत नाही.'

 

लग्न न झाल्याचे सलमानला आहे दुःख... 
जेव्हा सलमानला विचारले गेले की, त्याला दुःख आहे का की, त्याचे अद्याप लग्न झाले नाही. यावर सलमान म्हणाला, 'हो मला दुःख आहे की, मला अद्याप कोणत्याही मुलीने लग्नसाठी अप्रोच केले नाही.'

 

संजय लीला भन्साळीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे सलमान... 
सलमान 19 वर्षांनंतर संजय लीला भन्साळीसोबत 'इंशाल्लाह' मध्ये काम करणार आहे. त्या फिल्मसाठी सलमान खूप उत्सुक आहे आणि तो म्हणाला, 'इंशाअल्लाह' ला शूट करताना खूप मजाही येईल आणि आणि भांडणेही होतील कारण माझ्या आणि संजयमध्ये असे होतच राहते. 

 

नाही बनवणार साउथ फिल्मचा रिमेक... 
सलमानला साउथच्या फिल्म खूप आवडतात. त्याने सांगितले की, अशातच त्याने साउथचा अभिनेता अखिलची एक फिल्म पहिली. चर्चा अशीही होती की, कदाचित सलमान महेश बाबूची मोठी फिल्म 'महर्षि' चाही हिंदीमध्ये रीमेक करू शकतो. पण सलमानने मात्र याला नकार दिला.