आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचे भाषण ऐकून भारावला सलमान, म्हणाला 'बच्चे बच्चे मे है भारत', स्वतः सलमानने शेअर केला व्हिडीओ   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करत आहे. यादरम्यान तो बरेच फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत आहे. सध्या सलमान सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. सलमान कधी आपल्या पुतण्यांसोबत 'हॅन्ड स्लॅप खेळताना दिसतो तर कधी वडिल सलीम खान यांच्यासोबत गाणे म्हणताना दिसतो. त्यानंतर सलमानने एक माकडाला पाणी देतानाचा व्हिडिओही शेअर केला होता. आता अशातच सलमानने आपल्या इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक मराठी मुलगी भारताबद्दल भाषण देत आहे. आणि सलमान ते ऐकत आहे. त्या मुलीचे ते तडफदार भाषण ऐकून सर्वच जण नंतर तिचे कौतुक करतात. 

 

सलमानची इंस्टाग्राम पोस्ट... 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bacche bacche mein hai #Bharat

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

बातम्या आणखी आहेत...