Home | Gossip | Salman Khan Shares video From Sets Of Bharat Playing Cricket

'भारत' च्या सेटवर सलमान खानने मारले खूप चौके-छक्के, घामाने झाला ओलाचिंब, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला तर यूजर्स घेऊ लागले मज्जा 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 15, 2019, 12:20 AM IST

एका यूजरने लिहिले, 'आता बॅटने हरीण मरेल', तर दुसरा यूजर म्हणाला, 'शप्पथ विराटपेक्षाही चांगला स्ट्रोक आहे...'

  • एंटरटेनमेंट डेस्क : सलमान खान सध्या आपली अपकमिंग फिल्म भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग सेटवरून तो अनेकदा व्हिडीओज शेयर करत असतो. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडीओ शेयर करून त्याने कॅप्शन लिहिले आहे, 'Bharat Khelega.#onlocationstories@bharat_thefilm'. खास गोष्ट ही आहे की, सलमान राइट हैंड आहे आणि तो लेफ्ट हैंडने क्रिकेट खेळताना दिसत आहे आणि खूप जबरदस्त चौके-छक्के मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून यूजर्स कमेंट करत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले, 'सर तुम्ही क्रिकेटर व्हायला पाहिजे होते'. एका यूजरने विचारले, 'भाईजान लेफ्टी आहात का ?' याचप्रकारे अनेक युजर्स कमेंट करत आहेत.

    - क्रिकेट खेळताना सलमान पूर्णपणे घामाने भिजून गेला आहे. दरम्यान सलमानने ब्लॅक अँड व्हाइट कलरचे टी-शर्ट आणि शॉर्टे्स घातलेले आहेत.

    - एका यूजरने कमेंट करत लिहिले, 'भाई हिट आणि रन स्पोर्ट खेळात आहे'. एकाने कमेंट केले, 'आता हरीण बॅटने मारले जाईल'. दुसरा म्हणाला, 'शप्पथ विराटपेक्षाही चांगला स्ट्रोक खेळत आहेस'. एकाने विचारले, 'भाई नवी क्रिकेट टीम बनवण्याची तर इच्छा नाही ना ?'.

    ईदला रिलीज होणार फिल्म...
    डायरेक्टर अली अब्बास जफरची फिल्म 'भारत' याचवर्षी जूनमध्ये ईदला रिलीज होणार आहे. फिल्ममध्ये सलमानसोबत कतरिना कैफ, दिशा पाटनी, तब्बू, जैकी श्रॉफ, सुनील ग्रोवर आहेत. या फिल्मची शूटिंग पूर्ण झाल्यांनतर सलमान 'दबंग 3' ची शूटिंग सुरु करणार आहे.

Trending