आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसोबत वेळ घालवतोय सलमान, चित्रपटाच्या शूटिंगसाठी आईला नेले विदेशात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क: सलमान खान सध्या माल्टामध्ये 'भारत' चित्रपटाची शूटिंग करतोय. विशेष म्हणजे यावेळी शूटिंगमध्ये सलमानची आई सलमा त्याच्यासोबत आहे. माल्टामधून सलमानने आपल्या आईसोबतचे अनेक फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सलमानने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये तो आई सलमाचा हात पकडून त्यांना पा-या चढण्यास मदत करतोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होतोय. यूजर्स सलमानची प्रशंसा करत आहेत. व्हिडिओच्या बँकग्राउंडमध्ये 'करण-अर्जुन' चित्रपटातील 'ये बंधन तो प्यार का बंधन है' हे गाणे सुरु आहे. व्हिडिओ पोस्ट करत सलमानने लिहिले की,  'Yeh bandhan toh .. pyaar ka bandhan hai #Bharat'यापुर्वीही सलमानने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने कॅप्शन दिले होते की, 'अपनी जिंदगी के प्यार के साथ' यासोबतच एक व्हिडिओ शेअर केला होता, जामध्ये तो आईसोबत माल्टाच्या एका मॉलममध्ये दिसत होता. सलमान सध्या 'भारत' चित्रपटाची शूटिंग करतोय. हा चित्रपट अली अब्बास जफर डायरेक्ट करत आहेत. 'भारत'मध्ये सलमानसोबत कतरिना कैफ स्क्रीन शेअर करतेय. 
 

बातम्या आणखी आहेत...