Home | TV Guide | Salman Khan Welcome Wwe Braun Strowman At Show Das Ka Dus: Sonakshi Sinha & Diana Penty Fun With Braun Strowman

WWE फाइटर ब्रॉन स्ट्रोमैनने चॅलेंज करताच सलमानची उडाली भांबेरी, सोनाक्षी केले असे एन्जॉय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 12:33 PM IST

अभिनेता सलमान खानच्या ‘दस का दम’ या शोमध्ये यावेळी WWE फेम ब्रॉन स्ट्रोमैन सहभागी होणार आहे.

  • Salman Khan Welcome Wwe Braun Strowman At Show Das Ka Dus: Sonakshi Sinha & Diana Penty Fun With Braun Strowman

    मुंबईः अभिनेता सलमान खानच्या ‘दस का दम’ या शोमध्ये यावेळी WWE फेम ब्रॉन स्ट्रोमैन सहभागी होणार आहे. ब्रॉन स्ट्रोमैनला बघून उपस्थितांना घाम फुटला तर सलमानने त्याच्यासोबत भरपूर धमालमस्ती आणि डान्स केला. या शोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि डायना पेंटी त्यांच्या आगामी ‘हॅप्पी फिर भाग जाएगी-2’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्या. शोच्या या भागात ब्रॉन स्ट्रॉमैनच्या धमाकेदार एन्ट्रीचा एक व्हिडिओ मेकर्सनी रिलीज केला आहे. या व्हिडिओत ब्रॉन स्ट्रोमैन शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहे. तर सोनाक्षी त्याच्या हातावर लटकताना दिसतेय. सलमानला ब्रॉनने चॅलेंजदेखील दिले, पण त्यामुळे सलमानची भांबेरी उडाल्याचे या व्हिडिओत बघायला मिळत आहे. इतकेच नाही तर ब्रॉन सलमानसोबत डान्स करताना आणि त्याच्या गाजलेल्या 'दबंग' या चित्रपटातील फेमस डायलॉग - "हम तुम में इतने छेद करेंगे..." म्हणताना दिसणार आहे.

Trending