आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खान पुन्हा एकदा झाला मामा, अर्पिता-आयुषला कन्यारत्नाची प्राप्ती, नाव ठेवले 'आयात'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौथ्यांदा मामा झाला सलमान खान...

सलमान चौथ्यांदा मामा झाला आहे. त्याला अलविरा आणि अर्पिता या दोन बहिणी आहे. अलविराचे लग्न चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अतुल अग्निहोत्रीसोबत झाले आहे. अतुल-अलविरा यांना अयान हा मुलगा आणि अलिजा ही एक मुलगी आहे. तर अर्पिताला आहिल हा एक मुलगा आहे. आज तिने आयात या मुलीला जन्म दिला.   

  • सलमानच्या वाढदिवशी बाळाला जन्म देण्याची अर्पिताची होती इच्छा...

अर्पिताने सी-सेक्शन डिलिव्हरीतून बाळाला जन्म दिला आहे. अर्पिता आणि सलमान यांच्यात अतिशय स्ट्राँग बाँडिंग आहे. म्हणून आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवशीच नवीन पाहुण्याचे आगमन व्हावे, अशी तिची इच्छा होती. ठरवल्याप्रमाणे आज गोंडस मुलीचे आगमन खान आणि शर्मा कुटुंबात झाले आहे. 

  • अर्पितामुळे सलमानने यंदा मुंबईतच साजरा केला वाढदिवस

सलमान नेहमी आपल्या वाढदिवसाची पार्टी पनवेल फार्म हाऊसमध्ये देतो. मात्र शुक्रवारी अर्पिताची प्रसुती होणार असल्याचे पुर्वनियोजित होते. त्यामुळे सलमानने बहिणीसाठी मुंबईबाहेर जाणे टाळले. त्याने पहिल्यांदाच पाली हिलमधील सोहेल खानच्या घरी वाढदिवस साजरा केला. 10 वर्षात पहिल्यांदाच त्याने येथे पार्टी साजरी केली. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजे गुरुवारी सोहेल खानच्या घरी सलमानची बर्थडे पार्टी झाली. या पार्टीत सलमानच्या कुटुंबीयांसह अर्पितासुद्धा सहभागी झाली होती. याशिवाय बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. सलमानची तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूर, कतरिना कैफ, डेजी शाह, सौफी चौधरी, उर्वशी रौतेला, प्रग्या कपूर, निर्माता निखिल द्विवेदी आणि त्याची पत्नी, रविना टंडन आणि तिचे पती अनिल थडानी, हुमा कुरैशी, साकिब सलीम, बॉबी देओल सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.

  • अर्पिता आणि आयुषच्या लग्नाला झाली पाच वर्षे

18 नोव्हेंबर 2014 रोजी हैदराबादच्या हॉटेल फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता आणि आयुष विवाहबंधनात अडकले होते. दोघांचे लव्ह मॅरेज आहे. मार्च 2016 मध्ये त्यांचा मुलगा आहिलचा जन्म झाला. आयुष हिमाचल प्रदेशातील नावाजलेले राजकारणी अनिल शर्मा यांचा मुलगा आणि सुखराम शर्मा यांचा नातू आहे. आयुषने सलमान खान फिल्म्सच्या 'लव्हयात्री' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. 'क्वथा' हा त्याचा आगामी चित्रपट असून त्यात तो एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट करण ललित बुटानी दिग्दर्शित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...