आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा पनवेलच्या फार्महाऊसवर नव्हे या ठिकाणी साजरा होणार सलमानचा वाढदिवस, बहीण अर्पिता याचदिवशी दुस-यांदा होणार आहे आई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा उद्या (27 डिसेंबर) वाढदिवस असून तो वयाची 54 वर्षे पूर्ण करणार आहे. सलमान यंदा आपला वाढदिवस कुठे आणि कसा साजरा करणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. खरं तर दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत पनवेलच्या त्याच्या फार्महाऊसवर साजरा करत असतो.  पण यंदा तो आपला वाढदिवस पनवेलमध्ये नव्हे तर मुंबईतच साजरा करणार असल्याची चर्चा आहे.  व्यावसायिक आणि वैयक्तिक वचनबद्धतेमुळे सलमानने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पनवेलला जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

  • सोहेलच्या घरी होणार सेलिब्रेशन

सलमान आपला 54 वा वाढदिवस मुंबईतील पाली हिल भागात राहणारा भाऊ सोहेल खान याच्या घरी साजरा करणार आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, डेविड धवन, कतरिना कैफ, कबीर खान, प्रभुदेवा, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि जॅकलिन फर्नांडिस सलमानच्या पाहुणे म्हणून येणार आहेत.

  • अर्पिता खास बनवेल वाढदिवस

हा वाढदिवस सलमानसाठी संस्मरणीय असणार आहे. त्याची धाकटी बहीण अर्पिता 27 डिसेंबरला सी-सेक्शन डिलिव्हरीद्वारे आपल्या दुसर्‍या बाळाला जन्म देणार आहे. तिची प्रसुती हिंदुजा हॉस्पिटलमध्ये होणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे सलमान कुठेही न जाता त्याचा वाढदिवस घरीच साजरा करणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...