• Home
  • News
  • Salman Khan spotted having fun with kids in the water

एन्जॉय / लहान मुलांसोबत पाण्यामध्ये मस्ती करताना दिसला सलमान खान, फोटो पाहून युजर्स करत आहेत कौतुक 

सलमानने इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो 

दिव्य मराठी वेब टीम

Oct 09,2019 03:34:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अशातच सलमान खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खान काही लहान मुलांसोबत तलावात मस्ती करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून अभिनेत्याने कॅप्शन मध्ये लिहिले, 'काल तुमच्या भावाने पाण्यामध्ये खूप डुबक्या मारल्या, खूप कूल मुलांसोबत.'

सलमान खानने पुढे लिहिले, 'धरणीमातेचा आदर-सन्मान शिरसावंद्य...' सलमान खानच्या या पोस्टवर फॅन्स खूप कमेंट करत आहेत. इंटरनेटवर वेगाने व्हायरल असलेल्या या फोटोमध्ये सलमान खान पाच लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. सलमान खानने सर्व मुलांना सेफ्टी ट्यूबने पकडलेले आहे. लोक हा फोटो पाहून त्याचे खूप कौतुक करत आहे.

X
COMMENT