आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या 'राधे' आणि आमिरच्या 'लाल सिंह चड्ढा'च्या चित्रीकरणाला सुरुवात, आमिरच्या आईने दिला क्लॅप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः अभिनेता सलमान खानच्या आगामी 'राधे' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लोणावळ्यात सुरुवात झाली आहे. याची माहिती स्वतः सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन दिली. तर दुसरीकडे अभिनेता आमिर खाननेसुद्धा त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. 'लाल सिंग चड्ढा' हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आमिरची आई झीनत हुसैन यांनी या चित्रपटाचा क्लॅप दिला. 

'राधे'च्या टीममध्ये आहेत हे स्टार्स
सलमान खान स्टारर 'राधे'मध्ये त्याच्यासोबत दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रभू देवाने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमार आणि किआरा आडवाणी यांचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपटही रिलीजच्या मार्गावर असल्याचे समजते. 

मुहूर्ताचा क्लॅप देण्यासाठी पोहोचल्या झीनत 
आमिरने 'लाल सिंह चड्ढा'च्या चित्रीकरणाला गुरुवारपासून सुरुवात केली. हा चित्रपट टॉम हँक्स यांच्या 'द फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. मुंबईतील यश राज स्टुडिओजमध्ये या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल होणार आहे. चित्रपटाविषयीची अधिक माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.