Home | TV Guide | Bigg Boss-12 Launching Event: Salman Khan Stunning Dance Bigg Boss Launching Event On His Songs

'बिग बॉस-12' लाँचवेळी लग्झरिअस क्रूजने पोहोचला सलमान, 'बेबी को बेस पसंद' आणि 'ओ-ओ जाने जाना'सह अनेक गाण्यांवर थिरकला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 06:08 PM IST

गोव्यात या शोचे लाँचिंग झाले. सलमान खान व्हाइट कलरच्या लग्झरिअस क्रूजने इव्हेंटस्थळी दाखल झाला.

 • Bigg Boss-12 Launching Event: Salman Khan Stunning Dance Bigg Boss Launching Event On His Songs

  मुंबईः वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणा-या 'बिग बॉस'चे 12 वे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. तत्पूर्वी गोव्यात या शोचे लाँचिंग झाले. सलमान खान व्हाइट कलरच्या लग्झरिअस क्रूजने इव्हेंटस्थळी दाखल झाला. त्याच्या हातात बिग बॉसच्या नवीन सीझनचे पोस्टर होते. स्टेजवर यावेळी सलमानचा जलवा बघायला मिळाला. त्याने 'माशा अल्लाह', 'बेबी को बेस पसंद', 'ओ-ओ जाने जाना', 'अल्लाह दुहाई है' सह अनेक गाजलेल्या गाण्यांवर ठेका धरला. इतकेच नाही तर शो सुरु होण्यापूर्वीच सलमानने स्पर्धकांना सक्त ताकिदही दिली. तो म्हणाला, ''जो कुणी आपली सीमा ओलांडेल, त्याला तत्काळ घराबाहेर करण्यात येईल. यंदाच्या पर्वात थोडे बदल बघायला मिळणार आहेत. 'बिग बॉस-12'चा लोगो निळ्या रंगाचा आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारी पहिली जोडी ही भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया ही आहे. या

  'बिग बॉस-12'मध्ये सहभागी होणारे 21 कंटेस्टेंट...
  - 'बिग बॉस-12' मध्ये यंदा 21 स्पर्धक सहभागी होणार आहेत. यामध्ये 3 कॉमनर आणि 3 सेलिब्रेटी जोड्या असतील. तर 9 कंटेस्टंट एकटे शोमध्ये पार्टिसिपेट करतील.
  - यंदा टीव्ही कपल गुरमीत चौधरी-देबीना बनर्जी, पत्नी अंकिता कंवरसोबत बॉलिवूड अॅक्टर मिलिंद सोमण, टीव्ही अॅक्ट्रेस माहिका शर्मा आणि पोर्न स्पाटर डेनी-डीसह टीव्ही कपल शोएब इब्राहिम-दीपिका कक्कड, टीव्ही शो 'गुलाम' फेम परम सिंह, 'स्प्लिट्सविला' विनर स्कारलेट मी रोज आणि सोशल मीडिया स्टार सुमेर एस परीछा अर्थातच पम्मी आंटीला शोसाठी अप्रोच केले गेले आहे.

  या आहेत तीन हायएस्ट पेड जोड्या

  - 'बिग बॉस' सीजन 12 मध्ये माहिका शर्मा आणि डेनी-डीची जोडी हायएक्ट पेड राहिल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना प्रत्येक आठवड्यात 95 लाख रु. देण्यात येतील.
  - ब्रिटिश पोर्न स्टार डेनी (31) याचे माहिरा(24) सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. डेनी खुप श्रीमंत आहे, त्याचे स्वतःचे 7 हेलीकॉप्टर आहे आणि स्वतःचे एक प्रोडक्शन हाउस आहे.

  टीव्हीचे राम-सीता असतील दूसरे हायएक्स पेड स्टार
  टीव्हीचे राम-सीता म्हणजेच गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी शोचे दूसरे हायएस्ट पेड कंटेस्टेंट असतील. दोघंही प्रत्येक आठवड्याला 90 हजार रुपये घेतील.
  - देबिना आणि गुरमीतची ओळख 2008 मध्ये 'रामायण' मालिकेच्या सेटवर झाली होती. यामध्ये त्यांनी राम सितेची भूमिका साकारली होती.
  - येथेच दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली. नंतर त्यांनी 2011 मध्ये लग्न केले. गुरमीत लवकरच जेपी दत्ता यांच्या 'पलटन' मध्ये दिसणार आहे तर देबीना 'तेनाली रामा' मध्ये दिसणार आहे.

  तिसरी हायएस्ट पेड जोडी ही मिलिंद-अंकिताची
  - बॉलिवूड अॅक्टर मिलिंद सोमन (52) ने याचवर्षी मे महिन्यात 27 वर्षीय अंकिता कंवरसोबत लग्न केले. आता हे नवविवाहित दाम्पत्य 'बिग बॉस' मध्ये दिसणार आहे.
  - या दोघांना शोमध्ये येण्यासाठी प्रत्येक आठवड्यात 70 लाख रुपये रक्कम दिली जाईल. मिलिंद आणि अंकिताची ओळख एका नाइट क्लबमध्ये झाली होती. मिलिंद सोमणचे हे दुसरे लग्न आहे.
  - मिलिंदने 2006 मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. परंतू तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

 • Bigg Boss-12 Launching Event: Salman Khan Stunning Dance Bigg Boss Launching Event On His Songs
 • Bigg Boss-12 Launching Event: Salman Khan Stunning Dance Bigg Boss Launching Event On His Songs
 • Bigg Boss-12 Launching Event: Salman Khan Stunning Dance Bigg Boss Launching Event On His Songs
 • Bigg Boss-12 Launching Event: Salman Khan Stunning Dance Bigg Boss Launching Event On His Songs
 • Bigg Boss-12 Launching Event: Salman Khan Stunning Dance Bigg Boss Launching Event On His Songs

Trending