प्रियांकाने 'भारत' चित्रपट / प्रियांकाने 'भारत' चित्रपट सोडल्यामुळे नाराज आहे सलमान खान, पहिल्यांदा स्पष्टपणे आले समोर

Sep 05,2018 10:24:00 AM IST

मुंबई: प्रियांका चोप्राने सलमानचा 'भारत' चित्रपट सोडल्यानंतर सलमान खान तिच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे. 'बिग बॉस-12' च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सलमानने प्रियांका चोप्रासंबंधीत प्रश्नाचे उत्तर दिसेल. सलमानला प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये विचारण्यात आले की, प्रियांका चोप्रा बिग बॉसच्या घरात जाणार का?यावर सलमान म्हणाला- "नाही, प्रियांका चोप्रा बिग बॉसच्या घरात एंट्री करणार नाही, ती दुसरीकडे कुठेतरी एंगेज आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, ती 'भारत' करत नाहीये, परंतू भारती घरात जात आहे."


यापुर्वीही प्रियांकाच्या आईला सलमानने केले होते इग्नोर
प्रियांका 'भारत' चित्रपटात एंट्री करणार ही घोषणा सलमानने सोशल मीडियावर केली होती. परंतू चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याच्या 10 दिवसांपुर्वीच प्रियांकाने नकार कळवला. यानंतर तिच्या ऐवजी कतरिना कैफला घेण्यात आले. यानंतर डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोमध्ये सलमानने प्रियांकाची आई मधु चोप्राला पुर्णपणे इग्नोर केले होते. मीडिया रिपोर्टसनुसार, मधु चोप्रा संध्याकाळी 9.30ला इव्हेंटमध्ये पोहोचल्या आणि मनीष मल्होत्राला शुभेच्छा देण्यासाठी बॅकस्टेजवर गेल्या. याच वेळी सलमान आणि कतरिना रॅम्पवॉकची तयारी करत होते. यावेळी सलमानने प्रियांकाच्या आईला पाहताच नजरा वळवल्या आणि कतरिनाशी बोलायला सुरुवात केली. कतरिनानेही प्रियांकाच्या आईला इग्नोर केले.

X