इंदूर : सलमानने नेमबाजीच्या स्पर्धेत घेतला सहभाग, म्हणाला - 'नवीन आहे, पुढच्यावेळी जास्त गुण घेईन'  

त्याने 60 मिनिटांपर्यंत 300 मीटर दूरच्या टारगेटवर 60 नेम धरले... 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 29,2019 10:47:00 AM IST

महू/इंदौर : सलमान खान रविवारी महूच्या आर्मी मार्क्समेनशिप यूनिटमध्ये सुरु असलेल्या 62 व्या नॅशनल चॅम्पियनशिप बिग बोर रायफल नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला होता. यादरम्यान तिने 43 डिग्री तापमानामध्ये रेंजवर बनलेल्या टीनशेडच्या खाली प्रोन इव्हेंटमध्ये 60 मिनिटांपर्यंत सलग 300 मीटर दूरच्या टारगेटवर निशाना साधला. सलमानसोबत 6 स्पर्धकांनी नेमबाजी केली.

सोबतच्या एका स्पर्धकाने सलमानपेक्षा जास्त गुण घेतले आणि त्याला म्हणाला, "सर तुमच्यापेक्षा जास्त गुण घेतले आहेत." सलमानने विचारले, "किती वर्षांपासून प्रॅक्टिस करतो आहे." यावर त्याने उत्तर दिले, "11 वर्षांपासून." सलमान म्हणाला, "मी अजून नवीन आहे, पुढच्यावेळी तुझ्यापेक्षा जास्त मार्क घेईन."

खाजगी सुरक्षारक्षकांनी कुणालाही भेटू दिले नाही...
त्याच्या सुरक्षारक्षकांनी पूर्णवेळ त्याच्या बाजूला घेराव बनवून ठेवला होता. त्यांनी दुरून फोटो काढणाऱ्या लोकांनाही धक्के मारून बाजूला केले. पुन्हा पुन्हा म्हणत राहिले त्याचे जास्त फोटो काढू नका, त्यांनी नाही सांगितले आहे. फॅन्स सलमानच्या जवळ येऊच शकले नाहीत.

सेनेच्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवला...
- सलमानने सेनेच्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. तो एमरल्ड हाइट्स स्कूलमध्येदेखील गेला. तेथील मुलांची भेट घेतली. त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि आता त्याचे पुतणेदेखील येथेच शिकतात.

- महूहुन परतताना जेव्हा पुतण्याने सांगितले, "काका ही माझी शाळा आहे, तेव्हा सलमानने स्कूललादेखील व्हिजिट दिली. तेथे तो शूटिंगच्या सर्व मुलांना भेटला. तेथील शूटिंग रेंजदेखील पहिली. यांच्यापूर्वी नाना पाटेकर, नवीन जिंदल यांनीदेखील या स्पर्धेत भाग घेतला आहे. सलमानची ही पहिलीच वेळ होती."

'दबंग-3' दरम्यान झाला होता वाद...
सलमानची फिल्म 'दबंग-3' चे शूटिंग एप्रिलमध्ये महेश्वर आणि मांडूमध्ये झाले होते. शूटिंगदरम्यान शिवलिंगावर तख्त ठेवल्यामुळे काही संघटनांनी शूटिंगला विरोध केला होता. याव्यतिरिक्त किल्ल्याच्या मूर्तिला नुकसान झाल्यामुळेदेखील वाद झाला होता.

X
COMMENT