आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ डे सेलिब्रेशनसाठी सलमान खानने घेतली सुटी, रोहित शेट्टी होस्ट करणार वीकेंड का वार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः बिग बॉस 13 चा सूत्रसंचालक सलमान खान आज (27 डिसेंबर) आपला 54 वा वाढदिवस साजरा करीत आहे. एका इंग्रजी वेबसाइटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलिब्रेशनमुळे तो शोमधून एक दिवस सुटी घेत आहे. त्याच्या जागी, वीकेंड का वारचा एपिसोड बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहेत. शोमध्ये सततच्या होणा-या भांडणांना कंटाळून सलमान हा सोडण्याचा विचार करत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सिद्धार्थ-रश्मीच्या भांडणामुळे झाला होता नाराज... टीओआय या इंग्रजी वेबसाइटनुसार सलमान आपला वाढदिवस मित्र आणि कुटुंबीयांसह साजरा करत आहे. धाकटा भाऊ सोहेल खानच्या फ्लॅटवर हे बर्थडे डे सेलिब्रेशन झाले. सलमानने शोमधून सुटी घेतल्याने रोहित शेट्टी शोची धुरा सांभाळणार आहे. गेल्या आठवड्यात सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यात झालेल्या हिंसक भांडणामुळेसलमान नाराज झाला होता. यापूर्वीही सलमानने निर्मात्यांना दुसरा होस्ट शोधण्यास सांगितले होते. असे म्हटले जात आहे की, जर सलमानने हा कार्यक्रम सोडला तर त्याची जागा बॉलिवूड दिग्दर्शिक आणि नृत्यदिग्दर्शिक फराह खान घेईल.

मामा झाला सलमान...सलमानसाठी यंदाच्या वाढदिवशी डबल सेलिब्रेशन करत आहे. त्याची धाकटी बहीण अर्पिता पुन्हा एकदा आई झाली आहे. अर्पिता आणि तिचा पती आयुष यांनी त्यांच्या लेकीचे नाव आयात ठेवले आहे. यापूर्वी अर्पिता-आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...