आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा टीचरच्या प्रेमात पडली होती सलमानची हिरोइन, लग्नाच्या 7 वर्षांनंतर दिला मुलाला जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सलमान खानसोबत 'तेरे नाम'(2003) चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसलेली अभिनेत्री भूमिका चावला 40 वर्षांची होणार आहे. 21 ऑगस्ट 1978 रोजी दिल्लीमध्ये तिचा जन्म झाला. तिने 2000 मध्ये तेलुगु चित्रपट 'युवाकुडु' मधून अभिनयास सुरुवात केली. यासोतबच तिने काही साउथ चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले, परंतू सलमान खानसोबतच डेब्यू करुनही ती यशस्वी होऊ शकली नाही. चित्रपटात यश मिळाल्यानंतर भूमिकाने 2007 मध्ये आपले योगा टीचर भरत ठाकुरसोबत लग्न केले. 


लग्नापुर्वी त्यांनी 4 वर्षे एकमेकांना केले डेट 
लग्नापुर्वी भूमिका चावलाने योग गुरु भरत ठाकुरला 4 वर्षे डेट केले. योगा शिकत असताना पहिले दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांत प्रेमात झाले. दोघांचे लग्न 21 ऑक्टोबर, 2007 मध्ये देवळाली(नाशिक)च्या एका गुरुव्दारात झाले होते. लग्नाच्या 7 वर्षांनंतर भूमिकाने एका मुलाला जन्म दिला. भूमिका शेवटच्यावेळी 2016 मध्ये आलेल्या 'धोनी : द अनटोल्ड स्टोरी' मध्ये दिसली होती. यामध्ये तिने धोनीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. भूमिका आता चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या कुटूंबात व्यस्त आहे. 


खरे नाव भूमिका नाही 
भूमिकाचा जन्म दिल्लीच्या पंजाबी कुटूंबात झाला होता. भूमिकाचे वडील एमएस चावला लष्करात होते आणि तिची आई शिक्षक होती. भूमिकाचे नाव रचना असे होते. तिला घरात प्रेमाने गुडिया नावाने हाक मारायचे. भूमिकाला एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहे. चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी तिने आपले नाव बदलले. 

 

या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली भूमिका 
या चित्रपटांनंतर भूमिकाने 'रन' (2004)  'दिल ने जिसे अपना कहा' (2004), 'सिलसिले' (2005), 'दिल जो भी कहे' (2005), 'फैमिली' (2006) सोबतच अनेक चित्रपटात काम केले. परंतू ती बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवू शकली नाही.

 

या साउथ चित्रपटांमध्ये दिसली भूमिका 
2000 मध्ये तिने तेलुगी चित्रपट 'युवाकुडु' (Yuvakudu) मधून डेब्यू केला, यानंतर तिने 'खुशी'(2001) हा तेलुगु चित्रपट केला. यासाठी तिला बेस्ट अॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. यासोतबच तिने 'रोजा कुटम' (2002), 'मिस्सममा' (1995), 'आदन्थे अडो टाइप' (2003), 'जय चिरंजीवा' (2005), 'स्वागतम' (2008), 'भ्रमरम' (2009), 'ना स्टाइले वेरु' (2009) सोबतच अनेक साउथच्या चित्रपटांमध्ये काम केले. 

बातम्या आणखी आहेत...