आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी गोव्यात कसीनोमध्ये काम करायची सलमानची अभिनेत्री, चहा-पाण्यालाही उरले नव्हते पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मार्च 2018 मध्ये मुंबईच्या शिवडी हॉस्पिटलच्या जनरल वार्डमध्ये अभिनेत्री पूजा डडवाल टीबीवर उपचार घेत होती. तिला रिकव्हर झाल्यानंतर 7 ऑगस्टला डिस्चार्ज देण्यात आला. पूजाला सलमानने मदत केली होती. यानंतर तिने सलमानचे आभार मानले. ती म्हणाली -'आज मी फक्त सलमानमुळे जिवंत आहे.' पूजाने सलमानच्या 'वीरगती'(1995) चित्रपटामध्ये काम केले आहे. आजारापुर्वी पूजा गोव्यामध्ये कसीनोमध्ये काम करायची. पूजानुसार "जवळपास एकावर्षापुर्वी मला टीबी असल्याचे कळाले. मी काही वर्षांपुर्वी गोव्यामध्ये कसीनो मॅनेज करायचे. आजारपणामध्ये माझ्याजवळ अजीबात पैसे नव्हते. मी चहा पाण्यासाठीही दूस-यांवर डिपेंड होते."


पूजाच्या जवळच्या व्यक्तींनुसार, आजारामुळे तिचा पती आणि कुटूंबियांनी तिला ऐकटे सोडले होते. सुरुवातीला योग्य प्रकारे उपचार न मिळाल्यामुळे तिची परिस्थिती खुप बिघडली. टीबीमुळे तिचे वजन फक्त 23 किलो झाले होते. नंतर उपचार केल्यानंतर तिचे 20 किलो वजन वाढवण्यात आले. पूजा आता 43 किलोंची आहे. 


भोजपुरी अभिनेता रवी किशननेही मदत पाठवली
रवी किशनने पूजाच्या मदतीसाठी आपला सोबती पप्पू यादवला पाठवले होते. पप्पूने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये पूजा जनरल वॉर्डमध्ये दिसत होती आणि रवी किशनकडून एक व्यक्ती तिला फळ आणि पैसे देत होता. 
- एकदा बोलताना रवी किशनने सांगितले होते की, अनेक वर्षांपुर्वी त्याने पूजासोबत विनय लाड यांनी डायरेक्ट केलेल्या एका चित्रपटात काम केले होते. परंतू त्याने किती पैसे पाठवले हे त्याने सांगितले नव्हते.


पूजाने सलमानला मागितली होती मदत 
पूजा आजारादरम्यान म्हणाली होती की, - "मी गेल्या 15 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. कदाचित सलमानने माझा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच ते मदत करतील." काही ट्विटर यूजर्सने सलमानकडे पूजाच्या मदतीची मागणी केली होती. यानंतर पूजाला कपडे, साबण, डायपर, जेवणे आणि औषधांच्या गरजेपासून प्रत्येक वस्तू ही सलमानच्या फाउंडेशनकडून मिळाली. याच कारणांमुळे पूजा आज आजारपणातून बरी झाली आहे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...