आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Salman Khan Went Inside The House And Cleaned The Utensils, Saying Here Everyone Considers Himself As Tees Mar Khan

सदस्यांवर भडकला सलमान, शोच्या इतिहासात पहिल्यांदाच घरात घासली भांडी आणि स्वच्छ केले टॉयलेट, म्हणाला...

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉस 13 मध्ये सध्या हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय. सध्या शहनाज गिलकडे घराची कॅप्टन्सी आहे. पण तिच्या कॅप्टन्सीमध्ये घरातील सदस्य साफसफाई आणि इतर कामे करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण आहे. आता तर शोच्या नवीन प्रोमोत होस्ट सलमान खानच घरात प्रवेश करून साफसफाई करताना दिसतोय. व्हिडिओत सलमान किचनमध्ये भांडी घासण्यापासून ते टॉयलेट स्वच्छ करण्यापर्यंतची कामे करताना दिसतोय. 

  • भांडी घासताना दिसला सलमान खान

सलमान खान या पर्वातील सर्व सदस्यांबाबत आधीच चिडला आहे. अशा परिस्थितीत कॅप्टन शहनाजकडे दुर्लक्ष करणा-या कुटुंबातील सदस्यांमुळे प्रकरण अधिकच चिघळले आहे. घरातील एकही सदस्य घर स्वच्छ करण्यास सहमती दर्शवत नाही. हे पाहून स्वत: सलमान खानने घराच्या आत जाऊन साफसफाई केली. 

  • लज्जित झाले सदस्य

कलर्स वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सलमानचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात शोच्या इतिहासात पहिल्यांदाच सलमान घरात जाऊन साफसफाई करताना दिसतोय. सलमान घरात जाण्यापूर्वी सर्व सदस्यांना बेडरुममध्ये लॉक करण्यात आले आहे. सलमानला साफसफाई करताना बघून सर्व स्पर्धकांना ओशाळल्यासारखं झालं. सर्व स्पर्धक लज्जित झाले आणि त्यांनी सलमानची क्षमा मागण्यास सुरवात केली. सलमान सर्व सदस्यांना चिडून म्हणाला की, 'येथे कोणालाही लाज वाटत नाही. येथे प्रत्येकजण स्वत: ला तीस मार खां मानतो. लोक ही नौटंकी पाहत आहेत.' आता बिग बॉसच्या घरात आणखी कोणता ड्रामा बघायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे. 

  • सलमान दुस-यांदा झाला मामा

27 डिसेंबर रोजी 54 व्या वाढदिवशी सलमान दुसर्‍यांदा मामा झाला. त्याची बहीण अर्पिताने एका मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचे नाव आयात आहे. वाढदिवसाची यापेक्षा दुसरी चांगली भेट असू शकत नाही, असे सलमान म्हणाला.