आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये अजून एक कपलच्या लग्नाचे वृत्त समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खान लवकरच दूसरे लग्न करणार आहे. असे बोलले जातेय की, तो गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. एका इंग्रजी वेबसाइटसोबत बोलताना खान कुटूंबियांशी संबंधीत असलेल्या एका सुत्राने ही माहिती दिली.
लग्नासाठी तयार नाही कुटूंबिय
अरबाज आणि जॉर्जियाच्या या लग्नासाठी खान कुटूंबियांची परवानगी नाही. तरीही तो या लग्नाचे प्लानिंग करतोय. सलमान खान आणि त्याच्या पालकांना वाटते की, अरबाज त्याच्या आयुष्यात काही खास करु शकला नाही म्हणून त्याचे पहिले लग्न मोडले. मलायकाने अरबाजसोबत लग्न केले होते. कारण तो सलमानचा भाऊ आहे.
- अरबाज स्वतःची ओळख बनवण्याऐवजी, सुपरस्टार भाऊ सलमानवर डिपेंड राहतो. यामुळे मलायकाला घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला. यामुळेच अरबाजचे कुटूंब त्याला लग्नाची परवानगी देत नाहीये.
जॉर्जियाने केलेय बॉलिवूडमध्ये काम
जॉर्जिया एंड्रियानी मॉडल आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस आहे. ती 2017 मध्ये आलेल्या 'गेस्ट इन लंडन' मध्ये दिसली होती. यामध्ये कार्तिक आर्यन, कृती खरबंदा आणि परेश रावल होते. यासोबतच ती मागच्यावर्षी एका आयपीएल मॅच दरम्यान अरबाजसोबत दिसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.