आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan's Co Star Of Veergati Pooja Dadwal Discharge From Hospital After Beating Tuberculosis

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर बोलली पूजा डडवाल: सलमान खानमुळे आहे जिवंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: मार्चमध्ये मुंबईच्या शिवडी हॉस्पिटलच्या जनरल वार्डमध्ये उपचार घेत असणा-या पूजा डडवालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती मदत मागताना दिसत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खानची एनजीओ बीइंग ह्यूमनने तिची मदत केली. रिकव्हर झाल्यानंतर पूजाला 7 ऑगस्टला डिस्चार्ज देण्यात आला. पूजाने गोव्याला जाण्यापुर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये तिने सलमानचे आभार मानले. 

 

डॉक्टर म्हणाले सुधारली आहे पूजाची तब्येत 
- मुलाखतीत पुजाने सांगितले की, "कपडे, साबण, जेवण आणि औषधींचा सर्व खर्च सलमानच्या फाउंडेशनने केला. आज मी फक्त सलमानमुळे जिवंत आहे."
पूजाचे डॉक्टर ललित आनंदेने सांगितले की, मल्टीविटामिन आणि सप्लीमेंट्स घेतल्यानंतर पूजाची तब्येत खुप सुधारली आहे. 


गोव्यामध्ये कसीनो मॅनेज करायची पूजा 
आजारापुर्वी पूजा गोव्यामध्ये कसीनो मॅनेज करायची. पूजानुसार - "जवळपास एकावर्षापुर्वी मला टीबी असल्याचे कळाले. मी काही वर्षांपुर्वी गोव्यामध्ये कसीनो मॅनेज करायचे. आजारपणामध्ये माझ्याजवळ अजीबात पैसे नव्हते. मी चहा पाण्यासाठीही दूस-यांवर डिपेंड होते."
- पूजाच्या जवळच्या व्यक्तींनुसार, आजापणामुळे तिचा नवरा आणि कुटूंबाने तिला एकटे सोडले होते. योग्य उपचार न झाल्याने तिची तब्येत बिघडली. 

 

रवी किशननेही मदत पाठवली
रवी किशनने पूजाच्या मदतीसाठी आपला सोबती पप्पू यादवला पाठवले होते. पप्पूने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये पूजा जनरल वॉर्डमध्ये दिसत होती आणि रवी किशनकडून एक व्यक्ती तिला फळ आणि पैसे देत होता. 
- एकदा बोलताना रवी किशनने सांगितले होते की, अनेक वर्षांपुर्वी त्याने पूजासोबत विनय लाड यांनी डायरेक्ट केलेल्या एका चित्रपटात काम केले होते. परंतू त्याने किती पैसे पाठवले हे त्याने सांगितले नव्हते. 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...