Home | Gossip | salman khan's reality show bigg boss season 13 coming soon

या वर्षी येईल रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा 13 वा भाग, 12 वे सीजन संपल्यावर दोन वर्षे ब्रेक घेणार असल्याची होती चर्चा 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 11, 2019, 04:37 PM IST

टीव्ही इंडस्ट्रीत आहे एक अफवा...

 • salman khan's reality show bigg boss season 13 coming soon

  एंटरटेन्मेंट डेस्क : वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 12' यंदा काही खास कमाल करू शकला नव्हता. शो पूर्ण झाल्यानंतर, दोन वर्षासाठी ब्रेक घेणार असल्याची चर्चा होती. निर्माते त्याचे स्वरूप बदलणार असल्याचे बोलले जात होते. मात्र 12 आणि 13 व्या सीजनमये कोणतेच ब्रेक नाही, असे ऐकिवात आहे. हा शो मंजूर करण्यासाठी आधीच निर्णय घेण्यात आला होता, असेही बोलले जात आहे. मात्र अजून शो सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. हा शो आता कलर्स वरून झीटीव्हीवर सुरू होणार असल्याचीदेखील चर्चा होती. मात्र या बातमीने आता यावर पूर्णविराम लागला आहे. गेल्या सीजनविषयी बोलायचे झालेे तर प्रेक्षकांना ते मुळीच आवडले नव्हते. शिवाय टीआरपी कमी झाला होता.

  सूत्राच्या माहितीनुसार.....
  गेल्या सीजनला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे चॅनल आणि पाॅॅन्सरमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे १२वे सीजन संपल्यानंतर निर्मात्यांनी हा शो दोनवर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला चॅनलनेदेखील मान्य केले होते. मात्र काही महिन्यानंतर िनर्मात्यांनी नवीन स्वरूपात तयार करून चॅनलची भेट घेतली. यावर पूर्ण चर्चा झाल्यानंतर दोघांनी या वर्षी शो सुरू करण्याचा निर्णय घेतला.

  यामुळे फेल झाले 'बिग बॉस 12'
  - यंदा शोमध्ये कोणतीही वादग्रस्त व्यक्ती नव्हती. यापूर्वीच्या भागात राखी सावंत, कमाल आर खान, वीणा मलिक, स्वामी ओम, राजा चौधरी आणि अर्शी खान सारख्या स्पर्धकांनी खूप वाद घातला हाेता. त्यामुळे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
  सर्वच स्पर्धक शो जिंकण्याच्या उद्देशाने शांत राहिले. मात्र श्रीसंत कधी-कधी वाद घालायचा.

  - यंदा जोडप्यांमधील चर्चा इंटिमेंट दृश्यदेखील पाहायला मिळाले नाही. गेल्या वर्षी प्रिन्स नरुला-युविका चौधरी, अली मर्चेट- सारा खान, वीणा मलिक-अश्मित पटेल, राजा चौधरी- संभावना सेठ यांनी घराचे वातावरण इंटिमेंट करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

  सलमानची प्रसिद्धीदेखील कामी आली नाही
  सलमान स्वत: स्पर्धकांवर नाराज असल्याची चर्चा होती. शोला हिट करण्यासाठी बरेच वादग्रस्त मुद्दे टाकण्यात आले होते. तरीदेखील प्रेक्षकांना तो आवडला नाही. बिग बॉस क्रिया-प्रतिक्रियाचा खेळ आहे. सलमानने यात अनेक टि्वस्ट टाकले तरीदेखील काही फायदा झाला नाही.

Trending