आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan's Sister Arpita, Husband, Ayush Said, 'We Are Eagerly Waiting For The Baby'

पुन्हा आई होणार आहे सलमान खानची बहीण अर्पिता, पती आयुष म्हणाला, 'आम्ही बाळाची उत्सुकतेने वाट पाहात आहोत' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानची छोटी बहीण अर्पिता खान शर्मा दुसऱ्यांदा आई होणार आहे. याची अधिकृत माहिती अर्पिताचा पती आयुष शर्माने बुधवारी रात्री आयआयएफए अवॉर्ड्स सेरेमनीमध्ये दिली. आयुषने आपल्या ग्रीन कार्पेट अपिअरन्सदरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले, "हो, अर्पिता आणि मी दुसरे बेबी एस्पेक्ट करत आहोत. हा खूपच अद्भुत प्रवास आहे. बाळाची आम्ही उत्सूकतेने वाट पाहात आहोत."

2016 मध्ये मुलाची आई बनली होती अर्पिता... 
अर्पिता आणि आयुषच्या लग्नाला 5 वर्ष होत आले आहेत. 18 नोव्हेंबर 2014 ला ते  हैदराबादच्या हॉटेल फलकनुमा पॅलेसमध्ये विवाहबंधनात बांधले गेले होते. मार्च 2016 मध्ये त्यांचा मुलगा आहिलचा जन्म झाला होता. आयुष हिमाचल प्रदेश बेस्ड पॉलिटिशियन अनिल शर्मा यांचा मुलगा आणि सुखराम शर्मा यांचा नातू आहे.  

आयुषने सलमान खान फिल्म्सच्या बॅनरमध्ये बनलेला चित्रपट 'लव्हयात्री' ने बॉलिवूड डेब्यू केला होता. रिपोर्ट्सनुसार, त्याचा आगामी चित्रपट 'क्वथा' आहे, ज्यामध्ये तो एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट करण ललित बुटानी दिग्दर्शित करत आहे.  

बातम्या आणखी आहेत...