आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khurshid News In Marathi, Narendra Modi, Election Faver

मोदी म्हणजे पीएचडी असल्याच्या तोऱ्यात वावरणारा बालवाडीचा विद्यार्थी -खुर्शिद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी पुन्हा एकदा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत हल्ला चढविला आहे. मोदी म्हणजे पीएचडी असल्याच्या तोऱ्यात वावरणारा बालवाडीचा विद्यार्थी असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी खुर्शिद यांनी मोदींना नपुंसक म्हटल्याने मोठी खळबळ उडाली होती.
गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींबाबत बोलताना सलमान खुर्शिद यांनी मोदींवर हल्ला केला आहे. भाजपचे सरचिटणीस दिग्विजयसिंह वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जात होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दिग्विजयसिंह शांत आहेत. आता त्यांची जागा खुर्शिद यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खुर्शिद यांनी मोदीबाबत बोलताना अत्यंत हलक्या शब्दांचा वापर केला आहे.
यासंदर्भात सलमान खुर्शिद म्हणाले, की 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत क्लिन चिट मिळविण्याच्या मोदींचा प्रयत्न आहे. परंतु, असा दावा करणे म्हणजे चांगले गुण असलेल्या बालवाडीच्या विद्यार्थ्याने स्वतःला डॉक्टर समजण्यासारखे आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, राहुल गांधी यांनी केली होती खुर्शिद यांची कानउघाडणी....