आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Clearly Affraid From Big Budget Films He Said Makers Of Bharat To Limit Making Budget By 80 Cr.

बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले म्हणून घाबरला भाईजान, 'भारत'चे बजेट 80 कोटींपेक्षा जास्त वाढता कामा नये, दिली सक्त ताकीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुंबईत मोठ्या बजेटच्या चित्रपटाचे अपेक्षेनुसार प्रदर्शन न करू शकल्यामुळे आता बॉलिवूडचे मोठे कलाकारदेखील आपल्या चित्रपटावर जास्त पैसा खर्च करण्यास घाबरत आहेत. इंडस्ट्रीचा सुपरस्टार सलमान खानने आपल्या आगामी चित्रपट 'भारत'चे मेकिंग बजेट 80 कोटींच्या आतच ठेवण्याची सूचना दिली आहे. खरं तर, त्याच्या चित्रपटाचे बजेट 100 ते 150 कोटींच्या वर असते. पण आता जास्त कमाईचा दबाव टाळण्यासाठी सलमान खानने मेकिंगच्या बजेटमध्ये कपात केल्याचे धोरण आखले आहे. 

 

असे समाेर आले प्रकरण.. 
'भारत' चित्रपटाशी जोडलेले एक मुख्य दृश्य नुकतेच अबुधाबीमध्ये शूट करण्यात आले. त्या दृश्यात सर्कसमध्ये काम करणाऱ्या लोकांचा जथ्था वाळवंटातून जातो. सूत्राच्या माहितीनुसार, हे दृश्य अबुधाबीऐवजी राजस्थानात शूट करण्यात यावे असे सलमानचे मत होते. मात्र निर्माते आणि त्याचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीसोबत टी-सिरीज वरिष्ठ अधिकारी अबुधाबीला जाऊन महागडे शूट करून आले. त्यामुळे कमी खर्च करण्यात यावा असा सल्ला सलमानने दिला. शिवाय त्याने प्रमोशनच्या बजेटमध्येही कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. निर्माते सलमानच्या सूचनेची किती अंमलबजावणी करतात, ते पाहण्याजोगे ठरेल. 

 

आधीही दिले होते निर्देश 
सलमानने 'रेस 3'च्या मेकिंगवरदेखील लक्ष ठेवले हेाते. त्याचे बजेट 70 कोटींच्या पुढे जाऊ दिले नव्हते.'बजरंगी भाईजान'च्या निर्मितीवेळीही त्याने असेच निर्देश दिले होते. 

 

घाबरण्याचे कारण ? 
या वर्षीचे बिग बजेट चित्रपट 'रेस 3' आणि 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ची कमाई अपेक्षानुसार झाली नाही. तथापि 'ठग्ज'चे पूर्ण बजेट 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. त्यामुळे निर्मात्यांवर कमीत कमी 350 कोटी रुपये कमावण्याचा दबाव होता, तेव्हाच निर्मात्याच्या व्यतिरिक्त वितरकांना फायदा झाला असता. या दबावामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावरही प्रभाव पडला. 

 

बॉलिवूडचे 5 मेगा बजेट चित्रपट 

2.0  - 450 कोटी 
साहो - 300 कोटी 
बाहुबली 2 - 250 कोटी 
पद्मावत - 215 कोटी 
ठग्ज ऑफ हिंदोस्तान - 210 कोटी 

 

सलमानचे बिग बजेट चित्रपट 
टायगर जिंदा है - 210 कोटी 
प्रेमरतन धन पायो - 180 कोटी 
सुलतान/किक - 140 कोटी 

बातम्या आणखी आहेत...