आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने बनवलेल्या स्केचमुळे चाहत्यांनी त्याची 'मजनूं भाई'शी केली तुलना, व्हिडिओ होत आहे व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्क- बॉलिवूडचा दबंग सलमान खान जितका चांगला अभिनेता आहे, तितकाच चांगला तो चित्रकारपण आहे. सलमान खान आपल्या पेंटिंग्स आणि स्केचमुळे अनेकवेळा एक चांगला चित्रकार म्हणून जगासमोर आला आहे. परत एकदा सलमान आपली ही कला कॅन्वसवर सादर करताना दिसला. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो सुपरहीट गाण 'हर दिल जो प्यार करेगा'वर स्केच बनवताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओ आणि पेंटिंगवर सुझर्स खुप मेजेशीर कमेंट्स देत आहेत. एका युझरने तर त्याची तुलना थेट "वेलकम" चित्रपटातील अनिल कपूरच्या पात्राशी केली, ज्याला चांगली पेंटींग काढता येत नसते.

 

 

 

त्याने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहीले, 'स्केच बनवताना बॅकग्राउंडमध्ये हर दिल जो प्यार करेगा गाणे सुरू आहे...आणि हा डॉयलाग माझा मित्र साजिद नाडियाडवालाच्या ग्रँडसनने लिहीला आहे...त्यावेळेस मला वाटले हा कम्पलीट आहे पण...' या व्हिडिओत स्केच बनवल्यानंतर सलमान लिहीत आहे, 'इतक करा की कधीच कमी पडू नये, पण काम कमी पडतेच. पण करणे सोडू नका.' सलमानच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी त्याच्या पेंटीगचा खूप मजाक उडवत आहेत.